सोलापूरराजकीय

सोलापूर झेडपीसाठी भाजपमध्ये वाढले इच्छुक

सोलापूर : महापालिकेच्या निवडणूक निकालानंतर भाजपला मोठे यश मिळाल्याने आता झेडपी व पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजपकडे इच्छुकांची संख्या वाढल्याचे चित्र दिसत आहे.

महापालिका निवडणुकीत भाजपने 87 जागा घेत मोठे यश मिळवले. राज्यभरात भाजपचे स्थिती भक्कम झाल्याने लोकांचा विश्वास वाढला आहे. आता सर्वत्र जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. जिल्हा भाजपने रविवारी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. इच्छुक म्हणून मुलाखत देण्यासाठी सर्वच तालुका कार्यालयावर गर्दी झाल्याचे चित्र दिसून आले. दक्षिण सोलापूर तालुक्यातील जागांसाठी आमदार सुभाष देशमुख, तालुकाध्यक्ष कुलकर्णी, मनीष देशमुख यांच्या उपस्थितीत मुलाखती झाल्या. इच्छुकांनी मांडलेली मते विचारत घेत आमदार देशमुख यांनी त्यांना एकमत करण्यावर सूचना केल्या. मंद्रूप जिल्हा परिषद गटात 22 जण इच्छुक असल्याचे दिसून आले. आमदार सुभाष देशमुख यांनी मी किंवा माझ्या घरातील कोणीही नातेवाईक ही निवडणूक लढवणार नाही. फक्त कार्यकर्त्यांनी केलेले काम व लोकमानसतील त्याचा प्रभाव हाच क्रायटेरिया विचारात घेऊन पक्षातर्फे उमेदवारी दिली जाणार आहे. सर्वांनी सतत काम करायचे आहे. योग्य वेळी पक्ष न्याय देणारच आहे अशी भूमिका मांडली. मोहोळ मध्ये माजी आमदार राजन पाटील, अक्कलकोट मध्ये आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या उपस्थितीत मुलाखती घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

राष्ट्रवादीची मोठी तयारी…

जिल्हा परिषदेची सत्ता काबीज करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने मोठी तयारी केल्याची चर्चा आहे. बारामती मध्ये रविवारी अजित पवार गट व शरद पवार गट या दोन्ही गटाची बैठक झाली. जिल्हा परिषद व पंचायत समिती महाआघाडी करून एकत्र लढण्याचे ठरल्याचे आमदार राजू खरे यांनी सांगितले. नुकताच भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले  विजयराज डोंगरे यांना चार जागा देण्याचे ठरले आहे. त्याप्रमाणे त्यांनी या ठिकाणी काम करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीला दोन्ही शिवसेना व काँग्रेसचे साथ मिळाली तर जिल्हा परिषद गटात मोठी ताकद मिळणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button