सोलापूरन्यायालय

सोलापूर जिल्हा न्यायालयातील पहिली केस; छळाच्या गुन्ह्यातून सासूसह सहाजण दोषमुक्त

सोलापूर : सुनेचा छळ केल्याच्या आरोपातून सासूसह सहा जणांची सोलापूर जिल्हा न्यायालयाने दोष मुक्तता (डिस्चार्ज) केली तर फक्त पती व सासऱ्याविरुद्ध खटला चालविण्याचे आदेश दिले. जिल्हा न्यायालयात छळाच्या खटल्यात सासू, नणंदेसह दोषमुक्त होण्याचा हा पहिलाच खटला असल्याचे ॲड जाहीर सगरी यांनी सांगितले.

या प्रकरणात गुलाफशा ईशान हुंडेकरी (वय ३१ वर्षे, धंदा घरकाम, सध्या रा. १३८८, दाजी पेठ, सोलापूर)  यांनी २३ डिसेंबर २०२२ रोजी जेलरोड पोलीस  ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आयपीसी कलम ४९८, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे पती ईशानसह आठ जणाविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. फिर्यादीचे लग्न इशान नाहीद हुंडेकरी यांच्याबरोबर दि १८ ऑगस्ट २०१९ रोजी झाले होते. लग्नात फिर्यादीच्या आई वडीलां नी ६ तोळे सोन्याचे दागिने, पतीला कपडयासाठी ५१ हजार रुपये, हुंड्यासाठी २ लाख रुपये दिले होते. लग्नानंतर फिर्यादी ही सासरी म्हणजे साखर पेठ येथे नांदण्यास आली असताना सासरकडील लोकांनी सुरुवातीचे १५ दिवस व्यवस्थीत नांदविले. नंतर लग्नामध्ये मानपान दिला नाही व हुंडा दिला नाही तुमच्या मुलीला कायमस्वरुपी घेऊन जा अशी धमकी देण्यास सुरुवात केली. दि. १३ जून २०२१ रोजी फिर्यादीचे पती, सासू, सासरे, नणंद व त्यांचा नातेवाईक जावेद उर्फ वास्तव यांनी फिर्यादीला बोलावून घेऊन आम्हाला नवीन बंगला बांधण्यासाठी तुम्ही ५० लाख रुपये द्या असे सांगीतले. तसेच वरील लोकांनी फिर्यादीला व फिर्यादीचे आई वडीलांना मारहाण केली, असे  जेलरोड पोलीस  ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले. यानुसार सासू नईमा नाहीद हुंडेकरी, सासरा नाहीद खतालसाब हुंडेकरी, पतीचे मामा म. खालाद शहाबोद्दीन शेख,नणंद अफशा उर्फ शबनम फहद कर्नल, कहकशा मोहमंद मोहेमीन शेख, पतीची मामी  नसरीन उर्फ मुन्नी खालीक शेख, पतीचा मावस भाऊ जावेद उर्फ वास्तव जब्बार सय्यद, पती ईशान नाहीद हुंडेकरी यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणात जेलरोड पोलीसांनी तपास करुन सर्व आरोपींविरुध्द तपास अंमलदार बी. एस. मस्के यांनी मे. कोर्टात चार्जशीट दाखल केले होते. यात आरोपीचेवतीने अॅड. जहीर सगरी यांनी सीआरपीसी २३९ प्रमाणे सर्व आरोपींचा ज्युडिशियएल मॅजिस्ट्रेट कोर्ट यांच्याकडे डिसचार्ज (दोषमुक्त) चा अर्ज दाखल केला. ज्युडिशियएल मॅजिस्ट्रेट  बी. पी. वराडे यांनी सर्व आरोपींचा डिसचार्ज (दोषमुक्त) दि. ११ जुलै २०२४ रोजी रद्द केला.

या निकालाविरुध्द सर्व आरोपीनी अॅड. जहीर बी. सगरी यांचेमार्फत सेशन जज्ज योगेश ए. राणे यांचे कोर्टात क्रिमीनल रिवीजनचा अर्ज दाखल केला. सुनावणी वेळेस अॅड. जहीर सगरी यांनी युक्तीवाद केला की, आरोपीला खोटया गुन्हयामध्ये गुंतविण्यात आले आहे. ज्युडिशिएल मॅजिस्ट्रेट यांनी आरोपीचेबद्दल कायदेशीररित्या न्याय दिलेला नाही. आरोपीचे कुठलेही मुद्दे बघितले नाही व आरोपीचेवतीने जे मुद्दे ते मुद्दे गृहित धरले नाही. आरोपी यांनी कधीही हुंडयाची रक्कम मागीतली नाही. वास्तविक पाहता आरोपीने फिर्यादीमध्ये नमूद केले आहे की बांधकाम करण्यासाठी ५० लाखांची मागणी केली. हेही खोटे आहे. आरोपी सासू नईमा हुंडेकरी या पेशाने सोशल शाळेमध्ये शिक्षिका आहेत. २५ वर्षापासून त्या सेवा बजावत आहेत. त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडीया, ट्रेझरी शाखा येथे बांधकाम करण्यासाठी ५० लाख रुपये गृहकर्ज काढलेले आहे. या कर्जाचे नियमित हप्ते त्यांचे पगार खात्यातून कपात होत आहे. तसे बँक स्टेटमेंट कोर्टात सादर केले. फिर्यादीने ज्या तारखेस आरोपीनी  त्रास दिल्याचे सांगीतले आहे, त्या काळात कोव्हीडची साथ असल्याने फुल लॉकडाऊन होता. त्यामुळे सर्वजण आपआपल्या घरी होते .मग त्या काळामध्ये शारीरिक व मानसिक छळ करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. फिर्यादी ही स्वतः दि.  १३ जून २०२१ रोजी आरोपीबरोबर  भांडण करुन गेली आहे.त्यानंतर तिने थेट खोटी फिर्याद जेलरोड पोलीस ठाण्यात खोटी फिर्याद दिली. जवळपासून दिड वर्षाने उशीराने दिलेली फिर्याद (Delay of FIR) आहे. त्यामुळे पोलिसांनी लावलेले कलम हे आरोपीला लागू होत नाही. शारीरिक व मानसिक छळ केल्याबद्दल व कलम ४९८ए, ३२३, ५०४, ५०६, ३४ केलेल्या व्याख्यात बसत नसल्याचा युक्तीवाद कोर्टात केला. तसेच याच्या पुष्ठर्थ उच्च न्यायालयाचे निवाडे कोर्टात सादर केले.  अॅड. जहीर सगरी यांचा युक्तीवाद ग्राहय धरुन  जिल्हा न्यायाधिश योगेश ए. राणे यांनी आरोपी सासू, पतीचे  मामा म. खालाद शेख, ननंद शबनम कर्नुल, ५) कहकशा शेख (नणंद), पतीची मामी नसरीन खालीक शेख, मावस भाऊ जावेद सय्यद यांची या  फौजदारी खटल्यातून डिसचार्ज (दोषमुक्त) अंशतः मंजूर केला. तसेच सासरा नाहीद हुंडेकरी व पती ईशान हुंडेकरी  यांच्याविरुध्द पुढील खटला चालविला जाईल असा आदेश पारीत केला.यात सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील अॅड. शितल डोके यांनी काम पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button