सोलापूरजिल्हा परिषद

सोलापूर झेडपीचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार म्हणाले झेडपी सभागृहात का नाहीत थोर महापुरुषांची तैलचित्रे

सोलापूर : जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य व उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी पदभार घेतल्यापासून कामाचा सपाटा सुरू केला आहे. जिल्हा परिषदेचे नूतन अध्यक्ष दीपक वैद्य यांनी सोमवारी बांधकाम समितीची मासिक सभा घेऊन प्रशासक काळातील गेल्या चार वर्षात खर्च झालेल्या सेसफंडातील निधीची माहिती विचारली आहे तर सभेनंतर उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी सभागृहात फेरफटका मारून सभागृहात थोर महापुरुषांची तैलचित्रे का नाहीत? असा सवाल उपस्थित केला आहे.

चार वर्षानंतर जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीची मासिक सर्वसाधारण सभा सोमवार दि.२३ मार्च रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिपक वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली व उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांच्या उपस्थितीत शिवरत्न सभागृहमध्ये आयोजित करण्यात आलेली होती. या सभेला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, नरेंद्र खराडे आणि तालुक्यातील उपअभियंता, बांधकाम विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या सभेमध्ये बांधकाम विभागाकडून राबविण्यात येणारे सर्व योजनांची माहिती व कार्यपध्दतीबाबत चर्चा करणेत आली तसेच सन २०२४-२५ मधील सर्व योजनानिहाय मंजूर झालेल्या कामाचा लेखाशीर्षनिहाय आढावा घेण्यात आला. सन २०२४-२५मध्ये मंजूर करण्यात आलेले सर्व योजनाचे काम विहित कालावधीत पूर्ण करून घेऊन १००% निधी खर्च करणेबाबत सूचना देण्यात आले. तसेच शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र व अंगणवाडीमधील स्वच्छतागृह चांगल्या दर्जाचे ठेवणेबाबत सूचना देणेत आले. शिक्षणाची गुणवत्ता व पटसंख्या वाढविण्याच्यादृष्टीने जास्तीत जास्त शाळा मंजूरीचे प्रस्ताव सादर करणेबाबत सूचना देणेत आले. ज्या ठिकाणी शाळा व खोल्या मंजूर असून सदर बांधकाम जीर्ण झालेले आहेत. अशा बाबतीत शासन निर्णयातील प्रचलित तरतूदीनुसार तात्काळ निर्लेखनाची कार्यवाही तात्काळ करुन तसेच शाळा खोल्या बांधकामाचे काम तातडीने पूर्ण करणेबाबत सूचना देण्यात आल्या. अध्यक्ष वैद्य व उपाध्यक्ष पवार यांनी प्रशासक काळात गेल्या चार वर्षात सेसफंडातील खर्च झालेल्या निधी बाबत सविस्तर अहवाल सादर करण्याबाबत सूचना करण्यात आली. यातून जिल्हा परिषदेचे नूतन पदाधिकारी प्रशासक काळात झालेल्या खर्चाबाबत दक्ष असल्याचे दिसून आले.

महापुरुषांचे तैलचित्र लावा…

सभेनंतर उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी आपल्या कार्यालयात बसून कामकाज केले. त्यानंतर सायंकाळी ते जिल्हा परिषदेच्या बाहेर पडले. पुन्हा कार्यकर्त्यांचा फोन आल्यानंतर ते जिल्हा परिषदेत परत आले. त्यांनी थेट जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात फेरफटका मारून पाहणी केली. सभागृहात तीनच तैलचित्र दिसून आली . महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबरोबरच देशाचे राष्ट्रपती,पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री यांची तैलचित्र सभागृहात का नाहीत असा त्यांनी सवाल केला. ही तैलचित्रे तात्काळ लावण्याबाबत त्यांनी सूचना केल्या

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button