सोलापूरजिल्हा परिषद

शौचालय रंगवा अनं सन्मान मिळवा; सोलापूर झेडपीची मोहीम

सोलापूर : जिल्हयात 19 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर या कालावधीत जागतिक शौचालय दिन मोहिम राबविण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांनी दिली.

मोहिमेची टॅगलाईन “शौचालये सुशोभित करा, जीवन आनंद बनवा’ अशी आहे. 19 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर या कालावधीत “आमचे शौचालय आमचा सन्मान’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेनिमित्ताने ग्रामपंचायत अंतर्गत वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयाची दुरुस्ती, स्वच्छता वापर व रंगरंगोटी करणा-या कुटुंबप्रमुख तसेच सार्वजनिक शौचालयासाठी सरपंच व ग्रामपंचायत अधिका-याचा सन्मान करण्यात येणार आहे. जिल्हयात वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयाचा वापर दुरुस्ती व सुशोभीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून तसेच नादुरुस्त शौचालय वापरत आणणे, त्याची रंगरंगोटी करणे या सारखे उपक्रम राबविण्यात येणार आहे. याकरीता नियोजन करण्यात आले आहे.

सर्व ग्रामपंचायतना मोहिम वेळापत्रक देण्यात आलेले आहे. १९ नोव्हेंबर ते 15 डिसेंबर मिशन कार्यक्रम : सार्वजनिक शौचालयाच्या अनुषंगाने 3 Rs Repair (दुरुस्ती), Restore (जीर्णोद्धार करणे) Reline (पुर्न नुतनिकरण) करण्यासाठी लक्ष केंद्रित करणे. तसेच वैयक्तिक शौचालय/सार्वजनिक शौचालय परिसरात सुशोभिकरण करणे, त्याच बरोबर शौचालयाच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. वैयक्तिक शौचालयास पात्र लाभार्थीकरिता मंजुरी देणेत येणार आहे. ५ ते 10 डिसेंबर या कालावधीत वैयक्तिक शौचालय व सार्वजानिक शौचालय अंतिम सर्वेक्षण: या कालावधीत शौचालय कार्यात्मक, पेटिंग व सुशोभिकरण, स्वच्छता, चित्रकला, लोकसहभाग, याच्या आधारे मुल्यामापन करून सर्वोत्कृष्ट शौचालयाची निवड करण्यात येणार आहे. १० ते 20 डिसेंबर या कालावधीत मो हिम राबविण्यात येणार आहे. सर्वोत्कृष्ट वैयक्तिक व सार्वजनिक शौचालये निवड करून सन्मानित करण्यात येणार आहे.

 

गावपातळीवरील स्पर्धा 15 डिसेंबर) रोजी होणार असल्याची माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी दिली. सर्वोत्कृष्ट वैयक्तिक शौचालय स्पर्धा: ज्या लाभार्थ्यांकडे शौचालयाची सुशोभिकरण, उत्कृष्ट देखभाल, नियमित वापर करणाऱ्या लाभार्थ्यांची निवड करून सन्मानित करणेत येणार आहे. याद्वारे सार्वजनिक/सामुदायिक स्वच्छतागृहांची स्वच्छता, वापर आणि टिकाऊपणा वाढविण्यात येणार आहे.

वैयक्तिक शौचालय स्पर्धा स्तर :

• प्रत्येक ग्रामपंचायतीमधून ०२ उत्कृष्ट वैयक्तिक शौचालयाची निवड करावी. त्याचा सन्मान ग्रामपंचायत स्तरावर करावा.

• तालुकास्तरावर प्रत्येक ग्रामपंचायतीमधुन प्राप्त झालेल्या उत्कृष्ट वैयक्तिक शौचालयामधून ३ सर्वोत्कृष्ट शौचालयाची निवड करावी. त्याचा सन्मान तालुकास्तरावर करण्यात येणार आहे.

• जिल्हास्तरावर प्रत्येक तालुक्यातुन प्राप्त झालेल्या तीन वैयक्तिक शौचालयामधून जिल्हास्तरावर ०५ सर्वोत्कृष्ट वैयक्तिक शौचालयाची निवड करण्यात यावी. त्याचा सन्मान जिल्हास्तरावर करण्यात येणार आहे.

सार्वजनिक शौचालय स्पर्धास्तर:

• प्रत्येक तालुक्यातुन ०२ उत्कृष्ट सार्वजनिक शौचालयाची निवड करुन जिल्हास्तरावर घेणेत येत आहे. .

• प्रत्येक तालुकास्तरावरून प्राप्त होणाऱ्या सार्वजनिक शौचालयामधून जिल्हास्तरावर ०३ सर्वोत्कृष्ट सार्वजनिक शौचालयाची निवड करावी.

SBM MIS वर नोंद करणे.

• केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर वरील स्पर्धात सहभागी होण्यासाठी Event WTD 2024 अंतर्गत WTD 0.1, WTD 0.2, WTD 0.3, असे तीन मॉडयुल उपलब्ध करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button