सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील २१४ सेवानिवृत्त शिक्षक विहीत मुदतीत एमएससीआयटी संगणक परीक्षा उत्तीर्ण झाले नाही म्हणून त्यांच्या सेवानिवृत्त उपदानातून दिलेल्या वार्षिक वेतनवाढ कपात केल्याच्या विरोधात सोलापूर जिल्हा सेवानिवृत्त शिक्षक संघटनेने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत शिक्षकांच्या बाजूने निकाल झाला आहे. या शिक्षकांची पावणे दोन कोटीची रक्कम झेडपीने परत करावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
संघटनेच्यावतीने शिवानंद भरले, सुभाष फुलारी, सुधीर नाचणे, श्रीमंत गुंड, गुरुनाथ स्वामी, रमेश गायकवाड, मल्लिकार्जुन बडदाळ, सिध्देश्वर धराडे, आदीनी अडव्होकेट सतीश राऊत यांच्यामार्फत मुबंई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती रवींद्र घुगे, अश्विन भोबे यांच्या खंडपीठासमोर या रिटपीटीशनची सुनावणी झाली. न्यायालयाने सेवानिवृत्ताच्यां उपदानातून कसल्याही प्रकारची अति प्रधान रक्कम व संगणक रक्कम कपात करता येत नाही. कपात केलेली रक्कम सेवानिवृत्ताना ९० दिवसाच्या आत परत करावी, असे जिल्हा परिषदेला कोर्टाने बजावले असल्याचे भरले यांनी सांगितले.कोर्टाच्या या आदेशामुळे सोलापूर जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षकाचे अंदाजे १ कोटी ७० लाख रक्कम परत मिळणार आहेत

More Stories
ग्रामीण भागातील गरोदर महिलांना मोफत सोनोग्राफी सुविधा
मंगळवेढा न्यायालयाने विनयभंगाच्या गुन्ह्यात सुनावली आरोपीस तीन वर्षे सक्तमजुरी
सोलापुरात हिरकणी बसची ट्रकला धडक चालकासह महिला प्रवासी ठार