सोलापूरजिल्हा परिषद

ग्रामपंचायतीच्या १६ वा वित्त आयोगातील 25 टक्के निधी स्वच्छतेसाठी राखीव

सोलापूर : शाश्वत विकास ध्येय साध्य करणेसाठी नवरत्न थीमची प्रभावी अंमलबजावणी केल्यास गाव स्वच्छ व समृध्द होईल, असे प्रतिपादन यशदाचे उप महासंचालक डाॅ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करणेत आले होते. या कार्यशाळेचे उदघाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचेहस्ते करणेत आले.याप्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, सुर्यकांत भुजबळ, अमोल जाधव, यशदाचे प्रशिक्षक शांतकुमार स्वामी, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, नरेंद्र खराडे, प्रसाद काटकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. सतीश कोपुरवाड, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव प्रमुख उपस्थित होते.

१६ वा वित्त आयोग मधून ८० टक्के बेसिक ग्रॅन्ट मध्ये ५० टक्के स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन व पाण्याचे व्यवस्थापन बंधित निधी साठी खर्च करावा लागणार आहे. अबंधित निधीतून ५० टक्के खर्च करताना पंचायत विकास निर्देशांक नुसार १ किंवा २ थीम संकल्प म्हणून केलेले थीम वर २५ टक्के निधी किमान खर्च केला पाहिजे. रस्ते कामांना २५ टक्के पेक्षा जास्त निधी खर्च करता येणार नाही, असेही डाॅ. कलशेट्टी या्ंनी सांगितले. घनकचरा व्यवस्थापनला लक्ष द्या. सॅनिटरी नॅपकिन व डायपर यांची योग्य विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. प्रत्येक घरात चार डस्टबीनमध्ये कचराचे विलगीकरण करणे होणे अपेक्षित आहे. हे काम ग्रामपंचायतीने देखील करणे आवश्यक आहे. केंद्र व राज्य शासनाचे योजना ग्रामपंचायतीचे स्वतः चे उत्पन्न व वित्त आयोग असे अभिसरनाद्वारे कामे हाती घेता येईल असे उपसंचालक कलशेट्टी यांनी सांगितले. ग्रामपंचायत विकास आराखडा बनवताना गुणवत्तेस महत्वाचे स्थान दिले आहे. ग्रामसभेत सर्व घटकांची उपस्थिती अत्यावश्यक आहे.

गावपातळीवर कचरा वर्गीकरण करा 

सिईओ कुशल जैन यांनी जिल्हा व तालुका व गाव स्तरावर आराखडे तयार करून भरताना काळजी घ्या. जेणेकरून पुन्हा बदलाची वेळ येणार नाही याची दक्षता घ्या. सर्वोच्च न्यायालयाने दिलेले सुचनेनुसार ओला कचरा व सुका कचरा व घातक कचरासाठी डस्टबीन व कचराचे विलगीकरण करणे आवश्यक असल्याचे सिईंओ कुशल जैन यांनी सांगितले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ यांनी सर्व तालुका व ग्रामपंचायत स्तरावरील आराखडे भरणे साठी नियोजन करावे, असे आवाहन केले. या कार्यशाळेस यशदाचे प्रविण प्रशिक्षक शांतकुमार स्वामी, राजेंद्र वारगड, हनुमंत कांदे, भिमराव तुळजापूरे यांनी मार्गदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button