सोलापूर : जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयात घुसून साहेबाला शिवीगाळ करणाऱ्या करमाळा पंचायत समितीच्या लिपिकाच्या अडचणीत वाढ झाली आहे.
गेल्या आठवड्यात जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालयात हा प्रकार घडला होता. करमाळा पंचायत समितीत कार्यरत असलेल्या लिपिक पवार यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयात घुसून पत्नीची रजा कॅन्सल केल्याचा राग मनात धरून एकेरीची भाषा वापरली होती. लिपिक पवार यांची पत्नी करमाळा पंचायत समितीतील ग्रामीण पाणीपुरवठा विभागात कार्यरत आहे. गेल्या वर्षभर त्या रजेवर असल्याने कामाचा ताण पडत असल्याबाबत इतर कर्मचाऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे रजा तपासल्यावर त्या परस्पर रजेवर असल्याचे दिसून आले होते. लिपिक पवार यांनी पत्नीला परस्पर रजा दिली होती. याबाबत अधिकाऱ्यांनी जाब विचारल्यावर ते संतप्त झाले होते. या प्रकारानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी लिपिक पवार यांना नोटीस बजावली आहे. करमाळा पंचायत समितीहून सोलापूर जिल्हा परिषदेला येताना लिपिक पवार यांनी कोणाची परवानगी घेतली. कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयात कोणाच्या परवानगीने त्यांनी प्रवेश घेतला. पत्नीला रजा देताना व पगार काढताना कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्याची सही घेतली व प्रस्ताव दिला या संबंधित सर्व कागदपत्रे हजर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे लिपिक पवार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

More Stories
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांची नीट परिक्षा केंद्राना भेट
सोलापूरचा बारावीचा निकाल 87%; कॉपीमुक्त अभियानाचा दिसला प्रभाव
बोरामणीत तलवारीने वार करून माय लेकरांसह तिघांचा खून