सोलापूरजिल्हा परिषद

एप्रिलचा कडाका तरीही सोलापूर जिल्ह्यात नाही टँकरची मागणी

सोलापूर : जिल्हयात सन २०२५-२६ या वर्षातील टंचाई कृती आराखड्यामध्ये २४६ गावे व ५९९ वाडया/वस्त्यांचा समावेश करण्यात आलेला असून त्याचा अंदाजित खर्च रक्कम रु.१२०४.१. लक्ष इतका आहे. पण एप्रिल संपत आला तरीही एकाही गाव किंवा वाडी वस्तीवरून पाणीपुरवठ्यासाठी टँकर द्यावा अशी मागणी आलेली नाही अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी दिली.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी पदभार घेतल्यानंतर पहिल्यांदा जिल्ह्यातील टंचाईचा आढावा घेतला. त्यामध्ये ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने सादर केलेला अहवाल पुढील प्रमाणे आहे.

> सन २०२३-२४ टंचाई कालावधी अंतर्गत २१४ टँकरद्वारे १८० गावांत १२७३ वाडया/वस्त्यांवर पाणीपुरवठा करण्यात आला होता.

> सन २०२४-२५ टंचाई कालावधी अंतर्गत ६९ टँकरद्वारे ५९ गावांत ५८७वाडया/वस्त्यांवर पाणीपुरवठा करण्यात आला होता.

सन २०२५-२६ या वर्षातील टंचाई कृती आराखड्यामध्ये १७८ टँकरद्वारे १४७ गावांत ५८९ वाडया/वस्त्यांवर पाणीपुरवठा करणे प्रस्तावित असून मार्च अखेर ४८ टँकर प्रस्तावित असताना एकही टँकरची मागणी आली नाही. तथापि सदयस्थितीत दि. ११.०४.२६ पासून उत्तर सोलापूर तालुक्यात रानमसले गावामध्ये एक टँकर चालु आहे.

> सोलापूर जिल्ह्यात वसंतराव नाईकनगर ता. अक्कलकोट, भोयरे ता. बार्शी, पिंपरी आणि पळसमंडळ ता. माळशिरस येथे असे एकूण ०४ टैंकर प्रस्तावित आहेत.

> सन २०२५ -२६ टंचाई कालावधी अंतर्गत एकूण टँकर फीडिंग ठिकाण संख्या ५१ असून सार्वजनिक ११ तर खाजगी ४० उद्भवचा समावेश आहे.

> सन २०२४-२५ टंचाई कालावधी अंतर्गत एकूण ८.१७ कोटींची मागणी असून अद्यापपर्यंत निधी अप्राप्त आहे.

> सन २०२५ -२६ टंचाई कालावधी अंतर्गत नळ पाणी पुरवठा विशेष दुरुस्तीचे मौजे भोसे व ३९ गावे प्रादेशिक योजना (स्थ्यापत्य व यांत्रिकी दोन्ही) ता. मंगळवेढा, मौजे कासेगाव व ११ गावे प्रादेशिक योजना ता. पंढरपूर या योजनांना मा. जिल्हाधिकारी सोलापूर यांचेकडून प्रशासकीय मान्यता मिळाली असून सदरचे काम निविदा प्रक्रियेच्या स्तरावर आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button