सोलापूरजिल्हा परिषदशिक्षण

शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशाला शिक्षकांचे चॅलेंज!

अक्कलकोट तालुक्यातील प्रभारी केंद्र प्रमुखांना सोडवेना पदभार

सोलापूर : जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले यांनी केंद्रप्रमुखाबाबत काढलेल्या आदेशाला अक्कलकोट तालुक्यातील शिक्षकांनी ठेंगा दाखविला आहे.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांवरिल केंद्रप्रमुखांची बरीच पदे रिक्त होती. त्यामुळे प्रत्येक तालुक्यातील मुख्याध्यापकांना केंद्रप्रमुखांचा अतिरिक्त पदभार देण्यात आला होता. शिक्षकांमधून पदोन्नतीने केंद्रप्रमुखाची पदे भरावीत अशी प्राथमिक शिक्षक संघटनांनी मागणी लावून धरली होती. याची दखल मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी घेतली. सेवा जेष्ठता यादी तयार करून 60 शिक्षकांना गेल्या महिन्यात केंद्रप्रमुख पदावर पदोन्नती देण्यात आली. समायोजनाद्वारे या नवीन केंद्रप्रमुखांना नियुक्त्या देण्यात आल्या. पण ह्या नियुक्त्या देताना शिक्षक संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी आपला पदभार जाऊ नये याची काळजी घेतल्याचे दिसून आले होते. याबाबत ‘सोलापूर समाचार” ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर सीईओ आव्हाळे यांनी याची दखल घेतली. त्यामुळे अशा मुख्याध्यापकांकडे असलेला पदभार नव्याने केंद्रप्रमुख झालेल्यांना देण्यात यावा अशी सूचना करण्यात आली. त्याप्रमाणे प्राथमिक शिक्षणाधिकारी मिरकले यांनी पाच डिसेंबर रोजी आदेश जारी केले आहेत. मुख्याध्यापकांकडे असलेला केंद्रप्रमुखांचा अतिरिक्त पदभार तात्काळ नव्याने पदोन्नती झालेल्यांना द्यावा असे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे मुख्याध्यापकांना केंद्रप्रमुखाचा पदभार सोडणे क्रमप्राप्त ठरले होते परंतु अक्कलकोट तालुक्यातील शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशालाच कोलदांडा लावला आहे. शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी झाली नाही असे अक्कलकोट तालुक्यातील शिक्षकांनी माहिती दिली आहे विशेष म्हणजे या तालुक्यात कन्नड अल्पसंख्यांक शाळा असूनही या देशाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे दिसून आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांचा कारभार कडक असतानाही शिक्षक अजूनही पूर्वीच्या कारभारात मग्न नसल्याचे दिसून येत असल्याचे चर्चा सुरू झाली आहे.

शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर मुख्याध्यापकांना केंद्रप्रमुखाचा पदभार सोडण्याबाबत टिपणी ठेवली आहे. काही शिक्षकांनी 19 डिसेंबरच्या बैठकीत याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करतो असे सांगितल्यामुळे अद्याप अंमलबजावणी झालेली नाही.

परमेश्वर अरबळे,

प्रभारी गट शिक्षण अधिकारी

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button