सोलापूरजिल्हा परिषदमहाराष्ट्र

सोलापूर झेडपीचे सीईओ कुलदीप जंगम सर्वोत्कृष्ट सेवाकर्मी

सोलापूर : राज्यात जिल्हा परिषदांमध्ये सर्वोत्कृष्ट सेवा करणाऱ्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने पुरस्कार जाहीर केले आहेत. आठ अधिकाऱ्यांपैकी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम हे पहिल्या क्रमांकावर आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने यापूर्वी कार्यालयीन कामकाजाविषयी गुणांकन स्पर्धा घेतली होती. त्यात शंभर पैकी 80 गुण मिळवून सोलापूर जिल्हा परिषद राज्यात अग्रस्थानी राहिले यात सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सर्वोत्कृष्ट सेवाकर्मी अधिकारी म्हणून पुरस्कारप्राप्त राज्यात पहिल्या क्रमांकाचे पुरस्कार प्राप्तकर्ते ठरले आहेत. यात प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांचीही कामगिरी सरस ठरली आहे. यापूर्वी पुणे विभागात सोलापूर जिल्हा परिषद अहवाल होती आता राज्यातही अव्वल ठरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button