सोलापूरजिल्हा परिषद

सोलापूर झेडपीच्या आवारात तहानलेल्या पक्षांसाठी पाणपोई

रंगपंचमीनिमित्त एकमेकांवर कोरडा रंग उधळून आनंदाला उधाण

सोलापूर : कडक उन्हाळ्याची चाहूल लागली असून, या दिवसात पक्षी पाण्यासाठी वणवण हिंडत असतात. शहरात जागोजागी माणसे व प्राण्यांसाठी पाणपोई सुरू केल्या जातात पण पक्षांची तहान कशी भागणार? काळाची ही गरज ओळखून मराठा सेवा संघाने जिल्हा परिषद आवारातील बागेत पक्षासाठी पाण्याची सोय केली आहे. जपान पोरीचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्याहस्ते मंगळवारी करण्यात आला.

अलीकडे वाढते शहरीकरण व सिमेंटच्या या जंगलात चिमण्यांना घर करणे अशक्य होत चालले आहे. त्यामुळे चिमण्यांचा चिवचिवाट वाढविण्यासाठी पक्षीप्रेमींकडून कृत्रीम घरट्यांची संकल्पना पुढे आली आहे. या प्रयोगाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. उन्हाळ्यात मात्र तहान भागवण्यासाठी पक्षी फिरत असतात. त्यामुळे अलीकडे सोशल मीडियावर पक्षांची तहान भागविण्यासाठी घरासमोर मिळेल त्या भांड्यात पाणी ठेवा असा संदेश फिरताना दिसून येत आहे. मराठा सेवा संघाने गेल्या अनेक वर्षापासून ही संकल्पना उचलून धरत जिल्हा परिषदेच्या आवारातील बागेत पक्षांसाठी पाणपोई सुरू केली जाते. यंदा रंगपंचमीचे अवचित साधून ही पानपोळी सुरू करण्यात आली. यामुळे जिल्हा परिषदेच्या आवारात पक्षांचा आवाज घुमणार आहे. मराठा सेवा संघ शाखा जिल्हा परिषद शाखेच्याच्या वतीने पक्षांना पाण्याची सोय करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी कुलदीप जंगम यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे उपस्थित होते. प्रारंभी शाखेचे अध्यक्ष अविनाश गोडसे यांनी उपक्रमाची पार्श्वभूमी सांगितली. याप्रसंगी अनुपमा पडवळे, राजश्री कांगरे, वेशाली शिंदे, स्मिता पोरेड्डी, शितल कडलासकर, राजश्री रोजी, अनिता तुपारे, प्रियंका डांगे, स्मिता चव्हाण, अंजली पेठकर, आरती माढेकर, सविता मिसाळ, गौरी कदम, राणी तवटी, छाया क्षीरसागर, श्रीदेवी माने, अर्चना निराळी, सुवर्णा पंगुडवाले, भारती उमराणी, कास्ट्राईब संघटनेचे अध्यक्ष अरुण क्षीरसागर, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष राजेश देशपांडे, गिरीष जाधव, राज्य सहसचिव दिनेश बनसोडे, सुर्यकांत मोहिते, लिपीक संघटनेचे अध्यक्ष नागेश पाटील, आरोग्य संघटनेचे समीर शेख, संतोष जाधव, रणजीत घोडके, राजपाल रणदिवे, अमित सलगर, योगेश हब्बु, लक्ष्मण वंजारी, श्रीकांत मेहेरकर, उमाकांत कोळी, मल्लीनाथ स्वामी, सचिन चव्हाण,अनिल जगताप, सुहास चेळेकर, सचिन साळुंखे, सुधाकर माने- देशमुख, चेतन भोसले, रोहीत घुले, विकास भांगे, सचीन जाधव, संतोष शिंदे, गणेश साळुंखे, गणेश कलुबर्मे, मंजुनाथ चिंचोळे, संजय कांबळे, मंगेश पंदे , संजय कुंभार, नरसिंह गायकवाड , महेश केंद्रे, महेश जाधव, पणेश ओहोळ, दिपक सोनवणे, गणेश कलुबर्मे, विशाल घोगरे, विठ्ठल मलपे, संजय पाटील , भूषण काळे,रणजीत गव्हाणे, उमेश खंडागळे, सचिन खराडे, प्रसाद काशीद, संतोष निळ, जयंत पाटील, सचिन लामकाने, हरिभाऊ देशमुख, राजु देशमुख, किरण देशमुख, राजु आतकरे, महेंद्र माने, अनिल पाटील, अजित देशमुख, गोपाल शिंदे, नितीन जाधव, ऋषिकेष जाधव , अभिजीत निचळ, संतोष सातपुते, पी. बी.पवार, अमरसिंह पताले, सुरज कव्हाळे, संजय चव्हाण,रोहन भोसले , प्रकाश शेंडगे, विनायक कदम, प्रदिप सुपेकर, मनोज वडगावे,तानाजी पवार, प्रविण पवार, उत्कर्ष इंगळे, मुशीर कलादगी,शामेल आडाकुल , महेश आदमाने . रोहन भोसले, चंदु कोळी, हरिष म्हेत्रे, योगेश हबु , विलास मसलकर, सुजित पु काळे, बिचल, जमीर शेख, सैफन जमादार उपस्थित होते.

कर्मचाऱ्यात रंगपंचमीचा उत्साह…

झेडपीत आज बजेटचा मुहूर्त साधला गेला. या अनुषंगाने जिल्हा परिषदेत आज बऱ्याच आनंदाच्या गोष्टी घडल्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. सुधीर ठोंबरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, प्रसाद मिरकले, कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी यांनी टिळा होळी खेळून रंगपंचमीचा उत्साह द्विगुणीत केला. त्यानंतर जिल्हा परिषदेतील महिला कर्मचाऱ्यांनीही एकमेकावर रंगांची मुक्त ऊधळण करीत रंगपंचमी आनंदाने साजरी केली. कामकाज संपल्यानंतर प्रत्येक विभागातील कर्मचाऱ्यांनीही एकमेकांवर कोरडा रंग उधळून आनंद व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button