सोलापूरसण- उत्सव

मंद्रूप येथे श्रीरामनवमी उत्साहामध्ये साजरी

सोलापूर : नादातून या नाद निर्मितो, श्रीराम जय राम जय जय राम सत्संगाचा सुगंध राम श्रीराम जय राम जय जय राम…असे गीत म्हणत मंद्रूप येथील पेशवेकालीन श्रीराम मंदिर येथे प्रभू रामचंद्र यांचा जन्मोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा झाला.

रामनवमी उत्सवानिमित्त श्रीराम मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. शनिवारी रात्रभर जय हनुमान मंडळांने भजन सेवा केली. सकाळी श्रींच्या मूर्तीस महाअभिषेक करण्यात आला.पत्रकार विनोद कामतकर व केतकी कामतकर यांनी महापूजा केली.सुलभा कुलकर्णी यांनी श्रीस वस्त्र अर्पण केले.ज्ञानेश्वर ग्रामोपाध्ये यांनी महापूजेचे पौरोहित्य केले. सकाळपासूनच भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागला होता. महापूजेनंतर श्री रामरक्षा म्हणण्यात आली.

जय हनुमान भजनी मंडळ व वीरभद्र भजनी मंडळ यांच्या भजन सेवेनंतर गुलाल कार्यक्रम झाला.दुपारी बारा वाजता गुलालाच्या कार्यक्रमादरम्यान महिलांनी पाळणा गीत म्हटले. श्रीराम भक्त मंडळातर्फे कैरीचं पन्हे, सुंठवडा, डाळ प्रसाद वाटप केले.

प्रा.शिवशंकर रावत व प्रा. उमाशंकर रावत यांनी भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले. सुमारे दीड हजार भाविकांनी डाळ भात, शिरा प्रसादाचा लाभ घेतला.येथील श्रीराम सेवा संघातर्फे बुंदीचा लाडू प्रसाद वाटप करण्यात आला.भजनी मंडळाचा सत्कार मंदिराचे अध्यक्ष हर्षद देशपांडे यांनी केला.महापूजेसाठी प्रतिष्ठित नागरिक हर्षवर्धन देशमुख, सरपंच अनिता कोरे यांच्यासह भाविक उपस्थित होते.याप्रसंगी विठ्ठल गंभीरे, अतुल केवटे, सचिन साठे, ओंकार झेंडेकर, कौशिक कोळी, अभिषेक म्हेत्रे, गायत्री ग्रामोपाध्ये, गिरीश कुलकर्णी यांच्यासह भाविकानी उत्सव सोहळ्यासाठी मदत केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button