सोलापूरबँका- पतसंस्था

माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, शिंदे यांची मालमत्ता ताब्यात घेण्याची कारवाई

साखर कारखान्याचे 28 कोटी कर्ज थकवल्याचे प्रकरण

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदार अडचणीत आल्याचे चित्र दिसत आहे. 28 कोटीचे कर्ज थकवल्याप्रकरणी युनियन बँकेने अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, गोकुळ शिंदे यांच्यासह 19 जणांच्या नावावर असलेली दहा तारण मालमत्ता युनियन बँकेने प्रतिकात्मक ताब्यात घेण्याची कारवाई केली आहे.

या प्रकरणी युनियन बँक ऑफ इंडियाचे मुख्य व्यवस्थापक मनीष कुमार सिन्हा यांनी ताबा सूचना जाहीर केली आहे. यानुसार 28 कोटी 57 लाख 66 हजार 447 रुपयाच्या थकबाकीपोटी  बँकेने पुढील कर्जदार व सह कर्जदारांच्या मालमत्तेचा प्रतिकात्मक ताबा घेण्याची कार्यवाही केली आहे. यामध्ये सिद्धाराम म्हेत्रे उषा भगवान शिंदे लक्ष्मी गणपत शिंदे उषा भगवान शिंदे व स्वर्गीय भगवान शिंदे यांचे कायदेशीर वारसदार गीता शिंदे, स्वर्गीय सुवर्णमित्रे यांचे कायदेशीर वारसदार शिवराज मित्र गोकुळ शिंदे स्वर्गीय अंजनाबाई शिंदे यांचे कायदेशीर वारसदार गणपत शिंदे, गोकुळ शिंदे दत्ता शिंदे गणपत शिंदे शिवराज भित्रे कल्पना शिंदे प्रीती शिंदे धीरज शिंदे कपिल शिंदे आणि मयत बलभीम शिंदे यांचे वारसदार यांचा समावेश आहे. यांच्या नावे असलेल्या प्रॉपर्टीचा प्रतिकात्मक ताबा  बँकेने घेतला आहे व त्यांना वरील कर्जाची रक्कम, व्याज खर्च व अन्य आकस्मिक आकार भरण्याबाबत लक्ष वेधण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button