सोलापूरजिल्हा परिषदशिक्षण

सोलापूरचा पुढील माध्यमिक शिक्षणाधिकारी कोण?

स्पर्धेत आहेत ही नावे चर्चेत

सोलापूर : माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांची उचलबांगडी होणार अशी चर्चा सुरु झाल्यावर पुढील शिक्षणाधिकारी कोण? अशी चर्चा शिक्षकांत सुरु झाली आहे. यात काही नांवेही चर्चेतून पुढे येत आहेत.

माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांची कारकीर्द वादळी ठरली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी वेळ देऊनही कारभारात सुधारणा झाली नाही. कामाच्या तक्रारी वाढतच आहेत. नुकतेच पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा दौरा झाला. या दौऱ्यात लोकप्रतिनिधीनी जगताप यांच्या कार्यपध्यतीबाबत तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे त्यांची उचलबांगडी निश्चित मानली जात आहे. त्यामुळे त्यांच्या जागी इच्छुक असणाऱ्या नावांची चर्चा शिक्षकांमध्ये सुरू झाली आहे.

माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून यापूर्वी सोलापुरात प्राथमिक शिक्षण विभागात काम केलेले संजय जावीर यांचे नाव आघाडीवर आहे. पदोन्नतीनंतर त्यांची बदली झाली आहे. त्यानंतर  तृप्ती अंधारे हे दुसरे नाव पुढे येत आहे. त्यांनीही सोलापुरात उपशिक्षणाधिकारी म्हणून अत्यंत चांगले काम केले आहे. पदोन्नतीवर त्या लातूरला बदलून गेल्या आहेत. वेतन पथकाला असलेले मिश्रा यांचेही नाव चर्चेत पुढे येत आहे. या तिघांपैकी कोणाची वर्णी लागणार की आणखी नवीनच नाव पुढे येणार याबाबत जिल्ह्यातील शिक्षकांचे लक्ष लागले आहे. सुलभा वटारे याही योजना शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. पण माध्यमिकसाठी आपला कोणताही विचार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button