सोलापूरक्राईम

विनोद घुगे यांच्याकडे सांगोला पोलीस ठाण्याची जबाबदारी

नियंत्रण कक्षातील रणजीत माने यांच्याकडे करमाळा पोलीस ठाणे

सोलापूर : पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी ग्रामीण पोलीस विभागाकडील काही पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्याकडे सांगोला पोलीस ठाण्याची जबाबदारी देण्यात आली आहे तर त्यांच्या जागी नियंत्रण कक्षातील रणजीत माने यांना नियुक्त करण्यात आले आहे.

ग्रामीण पोलीस ठाण्याचा कार्यभार सुरळीत करण्यासाठी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगोला करमाळा आणि टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या कारभारात बदल केला आहे. सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भीमराव खणदाळे यांची नियंत्रण कक्षाकडे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी सांगोला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. करमाळा पोलीस ठाण्याचा पदभार नियंत्रण कक्षातील रणजीत माने यांच्याकडे देण्यात आला आहे. टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे दीपक पाटील यांची नियंत्रण कक्षाला बदली करण्यात आले असून त्यांच्या ठिकाणी नियंत्रण कक्षातील नारायण पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक घुगे यांनी यापूर्वी मंद्रूप, मोहोळ पोलीस ठाण्याचा कारभार पाहिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button