सोलापूरधार्मिक पर्यटनसण- उत्सव

मोहोळच्या नागनाथ यात्रेत गोडसे परिवारांची जलसेवा

सोलापूर : मोहोळ श्री नागनाथ महाराज यात्रेमध्ये कै. दत्तात्रय चांगदेव गोडसे यांच्या स्मरणार्थ जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील प्रशासन अधिकारी अविनाश गोडसे व मुंबईतील भाईंदर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक सतिश गोडसे यांच्यातर्फे यात्रेकरुना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली.

यात्रेकरूना मोहोळ पंचायत समितीचे माजी उपसभापती बाळासाहेब गायकवाड, कन्या प्रशाला चे प्राचार्य सुधीर गायकवाड यांच्याहस्ते पाणी वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी सुनिल गायकवाड, कारभारी गायकवाड, अविनाश गोडसे, सतिश गोडसे, आसावरी गोडसे, आदेश गोडसे, श्लोक गोडसे, जान्व्ही गोडसे, विभावरी गोडसे, माहेश्वरी गोडसे, वैष्णवी चव्हाण, शिवदत्त चव्हाण, ऋतुराज गायकवाड, यासीन ईनामदार, अय्युब इनामदार, सुरेश राऊत, सुहास निचळ, राजाभाऊ गुंड, सयाजीराव देशमुख, शशिकांत धोत्रे, दिलीप बरकडे, दिगंबर व्होनमाने, बाहुबली खiडेकर उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे गोडसे बंधूनी जलपान सेवा केल्याबद्दल यात्रे करून आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button