सोलापूरकृषीबाजारपेठराजकीय

सोलापूर बाजार समितीच्या सभापतीपदी दिलीप माने

कल्याणशेट्टी समर्थक सुनील कळके उपसभापती

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी माजी आमदार दिलीप माने यांची तर  उपसभापतीपदी सुनील कळके यांची निवड झाली आहे.

राज्याचे लक्ष लागलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापती पदाची निवडणूक रविवारी बाजार समितीच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी किरण गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभापतीपदासाठी  दिलीप माने यांचा फक्त एकच अर्ज आल्याने त्यांच्या नावाची बिनविरोध घोषणा गायकवाड यांनी केली.उपसभापती पदासाठी सुनील कळके यांचे एकमेव नाव आले. त्यामुळे त्यांचीही बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याहस्ते नूतन सभापती दिलीप माने यांचा तर आमदार देवेंद्र कोठे यांच्याहस्ते उप सभापती सुनील कळके यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संचालक मनीष देशमुख, रामप्पा चिवडशेट्टी व अतुल गायकवाड यांनीही त्यांचा सन्मान केला. या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्याची आतिषबाजी केली. या निवडीत सुरेश हसापुरे यांचे काय झाले अशी चर्चा रंगली आहे. संचालक मंडळाच्या निवडणुकीत हसापुरे यांचे काम महत्वाचे ठरले होते. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी निवडीत त्यांना संधी मिळेल अशी चर्चा होती. सभापती पदावर माने यांना संधी मिळाल्याने उपसभापती पद कल्याण शेट्टी समर्थकांकडे गेल्यामुळे हसापुरे यांना पुढील निवडीत संधी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button