सोलापूर ; महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पंढरपूर येथील पालखी मार्गावर महिला वारकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या हिरकणी कक्षाला भेट देऊन आतील सुविधांची माहिती घेतली. पंढरपूर शहराजवळील हिरकणी कक्षात बायो स्वच्छतागृहाची सोय करण्याची सूचना त्यांनी केली.
आषाढी वारीच्या काळात पंढरपूरमध्ये येणाऱ्या लाखों भाविकांसाठी विशेषतः महिला भाविकांच्यासाठी करण्यात आलेल्या सोयीसुविधांचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पालखी मार्गावर उभे केलेल्या हिरकणी कक्षाला भेटी दिल्या. यामध्ये वाखरी,भंडीशेगाव व पिराचीकुरोली येथील पालखी स्थळांना भेटी देऊन महिला स्वच्छतागृह, स्नानगृह, हिरकणी कक्षाची पाहणी केली.हिरकणी कक्षामध्ये बेड,विज ,पंखा,पाणी, विश्रांती कक्ष, स्तनदा मातेसाठी गोपनीय कक्ष, सॅनिटरी पॅड मशीन,बर्निंग मशीन, IEC , महिला कायदे, योजनांची माहिती तसेच आपत्कालीन नंबर कार्यरत आहे काय? याची पाहणी केली. आषाढी वारीसाठी येणाऱ्या महिला भाविकांच्या आरोग्यवारीसाठी आरोग्य, स्वच्छता व सुरक्षेसाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करणेबाबत सूचना दिल्या. दर्शन रांग,पालखी मार्गावर महिलासाठी करण्यात आलेल्या सोयीसुविधांची माहिती घेतली.यावेळी जिल्हा परिषदेचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, पंढरपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुनील संसारे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सोलापूर, बालविकास प्रकल्प अधिकारी पंढरपूर, अंगणवाडी सेविका,आशा , ग्रामसेवक,सरपंच, स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. हिरकणी कक्षात विविध सुविधांबरोबर लहान बाळांसाठी पाळणा व मुलांसाठी खेळणी, पुस्तके उपलब्ध करण्यात आल्याचे जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी प्रसाद मिरकले यांनी सांगितले.

More Stories
सोलापूरच्या महिला बचत गटाचा 30 टन कांदा गेला श्रीलंकेला
सोलापूर विधानपरिषद स्थानिक प्राधिकारी निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज
नाईट लँडिंगची सुविधा निर्माण करून सोलापूरची विमानसेवा जोमाने सुरू ठेवण्याची पालकमंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही