सोलापूरजिल्हा परिषद

सोलापुरात हायवेवर ट्रकचे एसी चोरणाऱ्या टोळीला अटक

सोलापूर: हायवेवर मालवाहतुक कन्टेनरमधून इलेक्ट्रीकल सामानाची ( AC ) चोरी करणारी टोळी निष्पन्न करुन सोलापूर ग्रामीण पोलिसाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 28  ए.सी. संच जप्त एकूण 10 लाख 50 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ट पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना सोलापूर जिल्हयामध्ये मालाविषयी गुन्हयांची उकल करणेकामी व पाहिजे फरारी आरोपी जेरबंद करणेबाबत आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  संजय जगताप यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ व त्यांचे पथकास मालाविषयी गुन्हयांची उकल व पाहिजे फरारी आरोपी जेरबंद करणेबाबत सुचना दिल्या होत्या.
त्याप्रमाणे सपोनि ज्ञानदेव वाघ व त्यांचे पथक मालाविषयी गुन्हयाची उकल करणेकामी मोहोळ पोलीस ठाणे येथील शिवाजी चौकातील ब्रिजखाली हजर असताना पथकातील पोलीस अंमलदार मोहन मनसावाले यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की टाकळी सिकंदर 3 इसम चोरीचे ए.सी.  संचाची विक्री करण्याकरीता एकत्रित  कारखाना वसाहत येथील दिपक साळुंके याचे घरासमोरील पत्राशेडसमोर उभे असलेबाबत खात्रीशीर बातमी मिळाली. त्यानुसार त्यांना ताब्यात घेवून त्यांचे नांव व पत्ता विचारता ते उडवाउडवीचे उत्तरे देवू लागले. त्यांना सपोनि ज्ञानदेव वाघ यांनी विश्वासात घेवून पोलीस असल्याचे सांगून त्यांना त्यांचे नांव व पत्ता विचारता त्यांनी त्यांची नांवे 1) दिपक बाबुलाल सोळूंके (वय 47 वर्षे, रा. कारखाना कॉलनी, टाकळी सिकंदर, ता. मोहोळ), शहाजी पठाण गायकवाड, 23 वर्षे, रा. टाकळी सिकंदर), प्रदिप रमेश चिंचकर, वय 26 वर्षे, रा. कारखाना कॉलनी, टाकळी सिकंदर) असे असल्याचे सांगितले. त्यानंतर दिपक सोळूंके याचे घरासमोरील पत्राशेडमध्ये जावून पाहिले असता, मिळालेल्या बातमीप्रमाणे 28 ए.सी. संच ठेवलेले दिसले. या ए.सी.च्या मालकी हक्काबाबत त्यांचेकडे विचारपूस केली असता, त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यानंतर त्यांना विश्वासात घेवून चौकशी केली असता, त्यांनी माहे 30 एप्रिल ते 01 मे 2026 दरम्यान अहमदनगर येथून कोची, केरळ येथे जाणाऱ्या मालवाहतूक पॅकबंद बॉडी असलेल्या वाहनाच्या चालक याचेबरोबर संगणमत करुन वाहनाचे पाठीमागील सिल तोडून सदर वाहनातील 28 ए.सी.  आणले असून त्याचे कोणतेही मालकी हक्काबाबत पुरावे दिले नसल्याने, त्यावरुन त्यांनी हे ए.सी. चोरुन आणलेबाबत खात्री झाल्याने, त्याबाबत मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कामगिरी पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक विजय कबाडे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि ज्ञानदेव वाघ, पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर, सहायक फौजदार नारायण गोलेकर, धनाजी गाडे, हवालदार मोहन मनसावाले, पोलीस अंमलदार दिनेश पवार, अक्षय डोंगरे, ज्ञानेश्वर पाथरुट, जगदीश राठोड, प्रमोद शिंपाळे, योगेश जाधव, सतिष बुरकुल यांचे पथकाने बजावली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button