सोलापूर : जिल्हा परिषदेचे तत्कालीन प्रभारी समाजकल्याण अधिकारी सचिन कवले यांनी पदभार असताना केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीला कागदपत्रे मिळत नसल्याने समाजकल्याण आयुक्त संतप्त झाले आहेत. संबंधित कागदपत्रे उपलब्ध करून देण्याबाबत त्यांनी 19 जून रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कळविले आहे.
याबाबत दिपक मुठाळ जिल्हाध्यक्ष शिक्षक भारती दिव्यांग शाळा, शिक्षक व शिक्षककेत्तर संघटना सोलापूर यांनी सात एप्रिल 2025 रोजी दिव्यांग आयुक्तालयास निवेदन दिले आहे. या निवेदनामध्ये अतिरिक्त पदभार असलेले जिल्हा समाज कल्याण अधिकारी, सचिन कवले यांची दिनांक ०८/१०/२०२४ ते दिनांक ०६/०२/२०२५ मधील कालावधीत झालेल्या बेकायदेशीर व भ्रष्ट कारभाराची चौकशी करणेबाबत निर्देशित केले आहे. त्याअनुषंगाने या कार्यालयातील चौकशी समितीने दिनांक १८/०६/२०२५ ते१९/०६/२०२५ रोजी चौकशी समितीने आपल्या कार्यालयात समक्ष हजर राहून सदर कालावधीतल कार्यालयाचे अभिलेख तपासणी केली होती. सदर कालावधीतील १. अंध शाळा, सोलापूर, २. मूकबधिर शाळा, मोहोळ, ३. रेड क्रास शाळा बार्शी, ४. अस्थिव्यंग शाळा, अक्कलकोट, ५. अभिनव मूकबधिर शाळा, सोलापूर या शाळांनी मागणी करूनही अभिलेख उपलब्ध करून न दिल्याने चौकशी करता आली नाही. त्याबाबत आयुक्त दिव्यांग यांना या कार्यालयाचे पत्र क्र. २७६२ दिनांक १६/०१२/२०२५ अन्वये कळविण्यात आले होते. प्रस्तुत प्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करणे बाबत याच कार्यालयास कळविलेले त्याअनुषंगाने खालील प्रमाणे समिती गठित करण्यात येत आहे. अनिल गिते सहाय्यक संचालक वित्त व लेखा प्रादेशिक उपायुकत समाज कल्याण, पुणे विभाग पुणे, पद: अध्यक्ष. संजय ननावरे, सहाय्यक लेखाधिकारी प्रादेशिक उपायुकत समाज कल्याण, पुणे विभाग पुणे: सदस्य.आर.पी. कणसे कार्यालय प्रादेशिक उपायुकत समाज कल्याण, पुणे विभाग पुणे. सदस्य सचिव. या समितीने नमूद मुद्याची चौकशी करून याबाबतचा स्वंयस्पष्ट अभिप्रायेोसह अहवाल दिनांक २५/०६/२०२६ पर्यत निम्नस्वाक्षरीत यांना सादर करावा, असे असे प्रादेशिक उपयुक्त, समाज कल्याण पुणे विभाग पुणे यांना कळविण्यात आले होते. परंतु कमी केला संबंधित शाळांचे कागदपत्रे उपलब्ध न केल्याने चौकशी पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे कागदपत्रे उपलब्ध करण्याबाबत सहाय्यक आयुक्त दिव्यांग सक्षमिकरण कार्यालय जिल्हा परिषद, सोलापूर यांना सूचना कराव्यात असे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी बुधवारी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कागदपत्रांची पूर्तता करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

More Stories
बापरे… सोलापूर विमानतळावरून नाईट लँडिंगसाठी किती अडथळे आहेत हे तुम्हाला माहित आहे का?
पांडुरंगाच्या पावन नगरीत आषाढीच्या सुविधेबाबत झेडपीची पहिल्यांदा झाली सभा
सोलापुरात हायवेवर ट्रकचे एसी चोरणाऱ्या टोळीला अटक