शेतकऱ्यांना केंद्रीय कृषी यांत्रिकीकरण उपअभियानातून ‘किसान ड्रोन’ हे विकत घेता येणार आहेत. यापूर्वी कृषी संस्थांना अनुदानावर ड्रोन देऊन त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्याचा लाभ दिला जाणार होता. त्याअनुशंगाने शेतकरी उत्पादक कंपन्यांना 75 टक्के तर कृषी विद्यापीठे व आयसीएआर केंद्रांना 100 अनुदान देण्याची घोषणा यापूर्वीच केंद्र सरकारने केली होती. ती कायम राहणार असून शेतकऱ्यांनाही थेट अनुदानावर ड्रोन खरेदी करता येणार आहे.सध्या मार्केटमध्ये 2 लाख 50 हजार पासून ते 10 लाखापर्यंतचे ड्रोन उपलब्ध आहेत.
यांची लागते परवानगी?
नागरी हवाई उड्डाण विभागाच्या माध्यमातून मान्यता दिलेल्या ड्रोनलाच अनुदान दिले जाणार आहे. याशिवाय अशा परवानगीने खरेदी केलेल्या ड्रोनलाच शेतीच्या कामासाठी उड्डाणासाठी परवानगी दिली जाते. अशी परवानगी देताना पहिल्यांदा ड्रोन चालविणाऱ्या प्रशिक्षण घ्यावे लागते. पायलटला प्रशिक्षण देण्याची सोय पुण्यामध्ये आहे. पायलटणे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याला प्रमाणपत्र दिले जाते. तसेच त्याला ड्रोनच्या उड्डानाच्या नोंदी ठेवण्यासाठी डायरी ही ठेवावी लागते. शेतकऱ्यांना सरकारने ठरवून दिलेल्या कंपनीचाच ड्रोन खरेदी करावा लागणार आहे.
नागरी हवाई उड्डाण विभागाच्या माध्यमातून मान्यता दिल्यावरच शेतकऱ्यांना ड्रोन खरेदी करता येतो. शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी ‘डिजिटल स्काय पोर्टल’ या वेबसाईटवर नोंदणी करावी लागणार आहे. ड्रोनमध्ये अपघात नियंत्रक, चढ-उतार क्षमता, जेथून उडविले तेथेच परत येण्याची यंत्रणा आणि त्यामध्ये छायाचित्रही काढता येणे गरजेचे आहे.ड्रोनची कंपनी ही भारतामधलीच असून त्यामध्ये सोई-सुविधा असणे गरजेचे आहे. शिवाय भारतीय गुणवत्ता प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. ज्या राज्यातील शेतकऱ्याने ड्रोन खरेदी केले आहे तिथेच त्याला प्रशिक्षण आणि देखभाल दुरुस्तीचे काम करता येणे गरजेचे आहे.
किती मिळणार अनुदान?
ड्रोन खरेदी करुन त्याचा शेतीव्यवसायात वापर करणे शेतकऱ्यांना शक्य होणार नाही. त्यामुळे अनुदानावर उपलब्ध करुन दिले जात आहे. यामध्ये अल्प किंवा अत्यल्प भूधारक शेतकरी तसेच अनुसूचित जाती जमाती यांना 5 लाखापर्यंतचे अनुदान असणार आहे. शेतकरी उत्पादक कंपनी तसेच इतर प्रवर्गातील शेतकऱ्यांना 4 लाखापर्यंतचे अनुदान. तर केव्हीके, कृषी विद्यापीठे, कृषी यंत्रे व अवजारे तपासणी यासारख्या संस्थांना 10 लाखापर्यंतचे अनुदान असणार आहे.
असे करते हे ड्रोन काम…
भारतात बंगळुरू मधील कंपनीने उत्पादित केलेले स्वदेशी ड्रोन शेतीसाठी उपयुक्त आहे. लग्नात व्हिडिओ शूटिंग करणाऱ्या दोन पेक्षा शेतीसाठी वापरण्यात येणारे ड्रोन हे मोठे असते. हे ड्रोन सुमारे 15 ते 20 लिटर द्रावण घेऊन पिकावर फवारणी करण्याची क्षमता आहे. या ड्रोन मध्ये संपूर्ण यंत्रणा स्वयंचलित असते. पायलट शेतावर फवारणीसाठी हा ड्रोन घेऊन गेल्यानंतर शेतात असलेल्या पिकाचा नकाशा त्यावरील स्क्रीनवर टाकून देतो. फवारणी करणारे क्षेत्र निश्चित झाल्यानंतर ड्रोनला चालू केले जाते. ड्रोनला जितक्या पिकावर फवारणी करायची आहे हे निश्चित करून दिल्यामुळे तितक्याच पिकावर ते फिरते. शेतात विजेचा खांब, झाड असेल तर हे अडथळे व्यवस्थितपणे पार करून फवारणीचे काम हे ड्रोन अचूक करते. टाकीतले औषध संपले किंवा काही अडचण निर्माण झाल्यास हे ड्रोन शेतातून परत येऊन पायलट जवळ अलगदपणे लँड होते.
बचत गटाच्या माध्यमातून सोलापूर जिल्हा विकास यंत्रणेने असे दहा ड्रोन बंगळुरूच्या कंपनीकडून विकत घेतले आहेत. हे ड्रोन खरेदी करताना आवश्यक त्या परवानग्या व पायलट चे ट्रेनिंग केलेले आहे त्यामुळे यंदाच्या हंगामात या ड्रोनचा चांगला फायदा होईल.
डॉ. सुधीर ठोंबरे
माजी संचालक,
जिल्हा विकास यंत्रणा सोलापूर


More Stories
सोलापूरच्या वाहन मालकाकडून 35 हजाराची लाच घेताना पुण्याचा फौजदार अटकेत
युरोपमधील “पॅरिसमहल’ मध्ये शेतकऱ्यांनी साजरी केली शिवजयंती
सोलापूर महापालिकेत सत्तेत आलेल्या भाजपाला पहिल्याच सभेत नामुष्की