सोलापूरजिल्हाधिकारी कार्यालय

चंद्रभागेत स्नान करताना तीन महिला बुडाल्या

सोलापूर: पंढरपूरच्या चंद्रभागा नदीमध्ये शनिवारी सकाळी तीन महिला भाविक बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

यामध्ये जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील दोन महिलांचा मृत्यू झाला आहे तर एका महिलेचा शोध सुरू आहे. सुनिता सपकाळ आणि संगीता सपकाळ अशी मृत महिला वारकऱ्यांची नावं आहेत तर एका महिलेचा शोध सुरू आहे. शनिवारी सकाळी चंद्रभागा नदीमध्ये पवित्र स्नान करण्यासाठी या महिला भक्त पुंडलिक मंदिराजवळ आल्या होत्या. उजनी धरणातून चंद्रभागा नदीमध्ये पाणी सोडले आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने या महिला नदीत बुडाल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button