सोलापूर : दि. कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या कार्यकारिणीची बुधवारी शिवरत्न सभागृह येथे झालेल्या बैठकीत जिल्हाध्यक्ष अरुण क्षिरसागर यांनी कार्याध्यक्षपदी उमाकांत राजगुरू तर सरचिटणीसपदी धन्यकुमार राठोड यांची निवड जाहीर केली.
कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे राज्याचे कार्याध्यक्ष गणेश मडावी, जिल्हाध्यक्ष अरुण भाऊ क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली. या बैठकीत नवीन जिल्हा शाखा कार्यकारणी जाहीर करण्यात आली. नवीन कार्यकारिणी पुढील प्रमाणे आहे. कार्याध्यक्ष: उमाकांत राजगुरु, सरचिटणीस: धन्यकुमार राठोड, कोषाध्यक्ष: कल्याण श्रावस्ती, उपाध्यक्ष: शंकर चलवादी, श्रीकांत मेहेरकर, रामेश्वर पवार, सावळा काळे, दिपक चव्हाण, अति. सरचिटणीस: योगेश कटकधोंड, नरसिंह गायकवाड, प्रशांत चाबुकस्वार, सिद्रामप्पा वैद्यकर, प्रणेश ओहोळ. मुख्य संघटक: चंद्रकांत होळकर, संघटन सचिव: रामदास गुरव, मकरंद बनसोडे, देवीदास म्हेत्रे, संतोष जाधव, मोहित वाघमारे, कार्यकारिणी सदस्य: नागसेन कांबळे, भगवान चव्हाण, आनंद जाधव, मिलिंद माहुले, विलास मसलकर, भिमाशंकर कोळी,महिला प्रतिनिधी: लता बनसोडे, अरुणा रांझणे. नुतन पदाधिकारी यांचे कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे राज्याचे कार्याध्यक्ष गणेश मडावी, जिल्हाध्यक्ष अरुण क्षीरसागर यांचेहस्ते पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संजय कांबळे, डी एम होटकर, एम. एम. जाधव, स्वप्नील ढोबळे, के जी राठोड, उदय सोनकांबळे, एम. ए. वांगीकर, गोपीचंद नारायणकर, चेतन भोसले, राजू गाडपल्ली, नागनाथ धोत्रे आदीसह संघटना पदाधिकारी, सभासद मोठया संख्येने उपस्थित होते.

More Stories
ग्रामीण भागातील गरोदर महिलांना मोफत सोनोग्राफी सुविधा
मंगळवेढा न्यायालयाने विनयभंगाच्या गुन्ह्यात सुनावली आरोपीस तीन वर्षे सक्तमजुरी
सोलापुरात हिरकणी बसची ट्रकला धडक चालकासह महिला प्रवासी ठार