सोलापूरक्रीडाजिल्हाधिकारी कार्यालयसंघटना-संस्था

सोलापुरात रेशन दुकानदारांना सुट्टी मिळाली आणि त्यांनी असा केला एन्जॉय

सोलापूर : केंद्र शासन आदेशानुसार अतिवृष्टी संभावणामुळे जून, जुलै व ऑगस्ट ह्या तीन महिन्याचे धान्य महाराष्ट्रातील सर्व रास्त भाव दुकानातून एकत्रित वाटपानंतर पहिल्यांदाच रास्त भाव धान्य दुकानदार बांधवांना सुट्टी मिळाल्याने दुकानदारातील सुप्त गुणांना वाव मिळावा व एक करमणूक म्हणून क्रिकेटच्या सामन्याचे आयोजन करण्यात आले होते.

जिल्हा पुरवठा अधिकारी, सोलापूर व अन्न धान्य वितरण अधिकारी तसेच सोलापूर जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार व केरोसीन विक्रेता असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने फक्त पुरवठा विभागाचे अधिकारी व दुकानदार यांच्यात हे भव्य क्रिकेट सामने आयोजित करण्यात आले होते.या कार्यक्रमाचा शुभारंभ  उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख, जिल्हा पुनर्वसन अधिकारी सुशांत बनसोडे यांच्याहस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. या सामन्यात मोहोळ, पंढरपूर, बार्शी,अक्कलकोट,दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, माढा, करमाळा, सांगोला, माळशिरस,मंगळवेढा, पुरवठा अधिकारी वर्ग, परिमंडळ अ, ब, क, ड असे चारही झोन मिळून एकंदरीत 16 संघाने या सामन्यात सहभाग नोंदविला. हा सामना फक्त पुरवठा विभागाअंतर्गत असलेल्या रेशन दुकानदार,अधिकारी ऑपरेटर अशाच भागांसाठी खास आयोजित केला होता.

ही स्पर्धा लिंगराज वल्याळ, कर्णिक नगर मैदान येथे दिनांक 22,23,आणि 24 ऑगस्ट 2025 पर्यंत आयोजित करण्यात आलीआहे. दि. 24 रविवार रोजी अंतिम फेरीत अधिकारी वर्ग विरुद्ध दक्षिण सोलापूर तसेच माढा संघ विरुद्ध ब झोन संघ अशी लढत झाली.

जिल्हा पुरवठा अधिकारी संतोषजी सरडे,अन्न धान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे, संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल पेंटर,परिमंडळ अधिकारी राजेश यमपुरे, प्रफुल नाईक, नंदकिशोर डोके, जिल्हा सचिव राजय्या कमटम , जिल्हा प्रमुख नितीन पेंटर,सर्व झोन अध्यक्ष व पदाधिकारी या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि समालोचक म्हणून मनीष काळे यांनी कार्यभार सांभाळला.

सेमी फायनल : ऑफिस टीम विरुद्ध दक्षिण सोलापूर यांच्यात झाला. दक्षिण संघ 6 ओव्हर 80 धावा. ऑफिस टीम 5.3 ओव्हर 81 धावा.

सेमी फायनल : ब झोन v/s माढा यांच्यात झाला. ब झोन संघ 6 ओव्हर मध्ये 55 धावा. माढा संघ 3.3 ओव्हर 56 धावा ,फायनल सामना : ऑफिस टीम v/s माढा यांच्यात झाला. ऑफिस टीम संघाने 65 धावा. माढा संघ 6 ओव्हर 66 धावा.

पहिले बक्षीस : माढा संघ, दुसरे बक्षीस :- अधिकारी वर्ग संघ, तिसरे बक्षीस : ब झोन संघ, चौथे बक्षीस : दक्षिण सोलापूर संघ, मालिकावीर : विक्रांत कदम माढा रेशन दुकानदार, बेस्ट बॅट्समन : विक्रांत कदम, माढा रेशन दुकानदार,बेस्ट बाउलर : दिपक शिंदे ऑपरेटर, बेस्ट विकेट कीपर : यल्लाप्पा वारगंटी महसूल सहाय्यक, बेस्ट क्षेत्रारक्षक : राजेश यमपुरे, परिमंडळ अधिकारी ब विभाग

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button