सोलापूर : मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा सुखद धक्का दिला आहे. पदोन्नतीने कर्मचाऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या नियुक्ती दिल्यामुळे कर्मचारी संघटनांनी आनंद व्यक्त केला आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी सोमवारी लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती केल्या. यामध्ये समायोजनाने त्यांच्या इच्छेनुसार नियुक्तही देण्यात आल्यामुळे कर्मचारी खुश झाले आहेत. पुढील कर्मचाऱ्यांना त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या ठिकाणी पदोन्नती देण्यात आली आहे. नितिन जाधव, कनिष्ठ प्रशासन अधिकारी शिक्षण विभाग येथून सहाय्यक प्रशासन अधिकारी पंचायत समिती दक्षिण सोलापूर, संगीता सुलगडले , ग्रामीण पाणीपुरवठा मुख्यालय ( स्थानांतरण), अनिल जगताप, शिक्षण माध्यमिक ( निव्वळ तात्पुरते स्वरुपात सेवा वर्ग ), राजेश सोनवणे, पंचायत समिती मोहोळ ( स्थानांतरण), नागेश कुटे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, पंचायत समिती कुर्डूवाडी ता. माढा ( पदोन्नती), विनायक धसाडे , कनिष्ठ प्रशासन अधिकारी, पंचायत समिती, दक्षिण सोलापूर ( पदोन्नती), संतोष पोळ, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, पंचायत समिती, माळशिरस ( पदोन्नती), प्रद्या कुलकर्णी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग ( पदोन्नती), प्रसाद देवळे , वरीष्ठ सहायक , यांत्रिकी, मुख्यालय (पदोन्नती), प्रभाकर डोईजोडे , वरीष्ठ सहायक, बांधकाम विभाग क्रमांक 2 ( पदोन्नती), सुनील मस्के, वरीष्ठ सहायक, शिक्षण विभाग, (पदोन्नती) परंतु कामकाज मूळ प्रधान मंत्री ग्रामसडक योजना, मुख्यालय. या कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यासाठी प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, महेश केंद्रे, शिवाजी राठोड यांनी परिश्रम घेतले. जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्यावतीने राजेश देशपांडे यांनी सीईओ जंगम यांचे याबद्दल आभार मानले आहेत.

More Stories
Ai watch: जनावरांच्या डॉक्टरांनी वाढवली जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी
विनायक कोंड्याल होणार सोलापूरचे महापौर
नीट परीक्षेत सोलापूरच्या डॉक्टर पती– पत्नीचे देश पातळीवर यश