सोलापूरजिल्हा परिषद

सीईओ कुलदीप जंगम यांचा आरोग्य विभागाला दणका

सोलापूर : जून 2019 मधील जिल्हा परिषद भरती घोटाळ्याचे प्रकरण उजेडात आल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम ॲक्शन मोडवर आल्याचे दिसून आले आहे. बदली  प्रकरणात अनियमितता केल्याप्रकरणी आरोग्य विभागातील सहाय्यक प्रशासन अधिकारी नागेश पाटील यांच्यासह पाच जणांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी मंगळवारी आरोग्य विभागातील सहाय्यक प्रशासन अधिकारी नागेश पाटील, कनिष्ठ प्रशासन अधिकारी उत्कर्ष इंगळे, गिरीष जाधव, अनुपमा  पडवळे, कनिष्ठ सहाय्यक विरुपाक्ष स्वामी यांची एक वर्षाची वेतनवाढ तात्पुरत्या स्वरूपात रोखली आहे. जून मध्ये जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या झाल्या. त्यामध्ये आरोग्य विभागाचे बदली पात्र कर्मचाऱ्यांची यादी करताना गडबड करण्यात आल्याची तक्रार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीनुसार सीईओनी आरोग्य विभागातील बदली पात्र कर्मचाऱ्यांची यादी तपासून पाहिली. यात बदली पात्र कर्मचाऱ्यांच्या यादीत एक ते आठ मध्ये फेरफार करण्यात आल्याचे दिसून आले. याप्रकरणी ठप ठेवत बदलीमध्ये अनियमितता केल्याने तापुरत्या स्वरुपात वरील कर्मचाऱ्यांची एक वेतनवाढ बंद केली. बदल्या वेळेस याबाबत गोंधळ झाला होता. परंतु त्यावेळेस बदल्या नियमानुसार झाल्याचे सांगण्यात आले होते. पण नंतर सीईओनी केलेल्या चौकशीत ही गडबड उघड झाली आहे. कारवाईनंतर यातील काही कर्मचाऱ्यांनी आपला संबंध नसल्याचे म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button