सोलापूरजिल्हा परिषद

झेडपीचे सीईओ कोहिनकर यांची दिव्यांग कर्मचाऱ्यांप्रती अशीही कृतज्ञता

सोलापूर : जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने सालाबाद प्रमाणे महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनिय च्यावतीने सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत दिव्यांग अधिकारी कर्मचारी यांचा सन्मान जिल्हा परिषद सोलापूरचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्याहस्ते डायरी व पेन देऊन करण्यात आला. सीईओ कोहिनकर यांनी चहापानाद्वारे दिव्यांग बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

याप्रसंगी सीईओ कोहिनकर यांनी जिल्हा परिषदेच्या प्रगतीमध्ये दिव्यांग कर्मचाऱ्यांचा  उल्लेखनीय वाटा असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. त्यामुळे याही पुढेही कर्मचाऱ्यांनी  चांगलं काम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करावं असे आवाहान केले. तसेच जागतिक दिव्यांग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी राज्य सरचिटणीस विवेक लिंगराज यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित सर्व दिव्यांग अधिकारी व कर्मचाऱ्यांच्यासोबत सीईओ कोहिनकर यांनी चहापान करीत कामांच्याबाबतीत संवाद साधला. या निमित्ताने साप्ताहिक सिद्धेश्वर टाइम्सच्यावतीने संपादक रमाकांत साळुंखे यांनी सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळी अंक सप्रेम भेट दिले. याप्रसंगी दिव्यांग कर्मचारी संघटनेचे सचिव लक्ष्मण वंजारी, हरीश मेत्रस, पिराजी सुरवसे,मुशीर कलादगी, मनोज राठोड,भीमाशंकर तेली,राम चव्हाण,आरती माढेकर, प्रज्ञा कुलकर्णी, वीरभद्र हिरजे, रामकृष्ण पाटील, शैलेश पाठक, जयंत पाटील, संजय सातपुते,अमित शहा,संतोष निळ,पंकज वेदपाठक, रामकृष्ण पेरला, प्रताप चव्हाण,मनोज राऊत आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष तजमुल मुतवली यांनी तर सूत्रसंचालन डॉ. एस. पी .माने यांनी आणि आभार प्रदर्शन पिराजी सुरवसे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कार्याध्यक्ष बसवराज दिंडोरे, सचिव विलास मसलकर, राकेश सोडी, श्रीशैल देशमुख, रफिक शेख,वर्षा अवधूर्ती,महानंदा कुंभार, विशाल घोगरे, रोहित घुले, श्रीधर कलशेट्टी, शिवाजी राठोड, संतोष शिंदे, अंबिका वाघमोडे, निर्मला राठोड, स्वाती स्वामी आदींनी परिश्रम घेतले.

मराठा सेवा संघ जिल्हा परिषद कर्मचारी शाखेतर्फे  दिव्यांग सहाय्यता दिनानिमीत्त जिल्हा परिषदेतील दिव्यांग कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी ग्रामीण पाणी पुरवठा, बांधकाम, कृषी, मुख्य लेखा,,  प्रशासन व शिक्षण विभागाकडील कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष अविनाश गोडसे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button