सोलापूरजिल्हा परिषद

अखेर.. सोलापूर झेडपीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष ठरले

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी आता काही तास शिल्लक राहिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या अधिकारानुसार जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी नावे फिक्स केली आहेत.

 

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया 18 मार्च रोजी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली सचिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या उपस्थितीत होणार आहे. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम पुढील प्रमाणे घोषित करण्यात आला आहे. सकाळी १० ते १२: नामनिर्देशनपत्र स्विकारणे.

दुपारी २.०० वाजता : सभेची सुरुवात.

२.०० पासून: नामनिर्देशनपत्रांची छाननी (उमेदवार घोषित करणे)

२.१५ ते २.३० : उमेदवारी अर्ज मागे घेणे.

२.३० पासून: निवडणुकीच्या कामकाजास सुरुवात.

३. ०० पासून: अध्यक्षाची निवड होईपर्यंत.

उपाध्यक्ष पदासाठी नामनिर्देशनपत्रांची छाननी. (उमेदवार घोषित करणे)

३.१० ते ३.२५: उमेदवारी अर्ज मागे घेणे.

३.२५ नंतर: निवडणुकीच्या कामकाजास सुरुवात उपाध्यक्षाची निवड होईपर्यंत.

अध्यक्षपद: आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्ग,

उमेदवारीसाठी सादर करावयाची कागदपत्रे

१. जातीचा दाखला

२. जातपडताळणी प्रमाणपत्र किंवा जातपडताळणी प्रस्ताव कार्यालयात जमा केलेचे संबंधित कार्यालयाची पोहोच.

३. आधार कार्ड

जातीचा दाखला कास्ट व्हॅलेडीटी किंवा कास्ट व्हॅलेडीटी मध्ये व्हॅलेडीटीसाठी प्रकरण दाखल केल्याची पोच पावती

 

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची नवे फिक्स केल्याचे सांगण्यात आले. भाजपच्या जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित सर्व सदस्यांना आधी होटगी रोडवरील बालाजी सरोवर हॉटेल येथे उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. त्यानंतर सर्व सदस्य एकत्रितपणे एकाच वेळी जिल्हा परिषदेच्या सभागृहात प्रवेश करणार आहेत. पालकमंत्री गोरे सांगतील त्याच सदस्याने अध्यक्ष व उपाध्यक्ष पदचा अर्ज भरावयाचा आहे. भाजप बरोबर इतर पक्षाच्या गटनेत्यांनी आपल्या सदस्यांना मतदान करण्याबाबत व्हिप बजावला आहे. अध्यक्षपदासाठी बार्शीचे वैद्य तर उपाध्यक्ष पदासाठी करकंबचे आदिनाथ देशमुख, कुरुलचे जाधव, मार्डीचे इंद्रजीत पवार यांची नावे चर्चेत आहेत. महिलाराज आणायचे ठरवल्यास यापेक्षा वेगळी नावे येऊ शकतात. भाजपचा अध्यक्ष व उपाध्यक्ष बिनविरोध होऊ नये म्हणून विरोधी पक्षातर्फेही मोठी यंत्रणा लावण्यात आली आहे. त्यामुळे मतदान होणारच आहे. सभागृहात भाजपचे सर्वाधिक मतदार आहेत. भाजपसोबत जायचे का? याबाबत शिवसेनेने काही जाहीर केलेले नाही. राष्ट्रवादीतर्फे भाजपचा अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी उमेदवार कोण असेल याबाबत उत्सुकता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button