सोलापूरकृषीमहाराष्ट्र

हनी दर्डा यांचा ‘प्रयोगशील महिला कृषी उद्योजक’ म्हणून सन्मान

सोलापूर: नाशिकमध्ये ह्युमन सर्व्हिस फाउंडेशन आणि मीडिया एक्झिबिटर्स प्रा.लि यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कृषीथॉन’या आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात दि.१६ नोव्हेंबर रोजी ‘प्रयोगशील महिला कृषी उद्योजक’ म्हणून हनी दर्डा यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

हनी दर्डा यांच्या दूरदृष्टीमुळे, मेहनतीमुळे आणि नेतृत्वगुणांमुळे आज संपूर्ण देशांत नव्हे नव्हे तर संपूर्ण जगात शेती क्षेत्रात ‘एक्झोम लाईफ सायन्सेस’ हे नाव एक वेगळी ओळख निर्माण करत आहे. हनी दर्डा या केवळ एक यशस्वी उद्योगपती नाहीत, तर शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी समर्पित असलेल्या एक दूरदर्शी नेत्या आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला .

हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपल्या मनोगतात दर्डा म्हणाल्या, जगेल माती तर टिकेल शेती. माती चांगली राहिली तर शाश्वत शेती होईल आणि शेवटी त्या म्हणाल्या हा पुरस्कार माझा वैयक्तिक नसून याच श्रेय संपूर्ण एक्झोम टीमला जाते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button