सोलापूरजिल्हा परिषद

सोलापूर झेडपी पदाधिकाऱ्यांच्या दालनाची रंगरंगोटी सुरू

सोलापूर : जिल्हा परिषदेत तब्बल चार वर्षानंतर पदाधिकाऱ्यांचे आगमन होणार आहे. त्यामुळे प्रशासनाने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासह सभापतींच्या दालनांची रंगरंगोटी सुरू केली आहे.

शनिवार दिनांक 6 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या जागांसाठी मतदान होणार आहे. मतमोजणीनंतर जिल्हा परिषदेचे सदस्य निवडले जाणार आहेत. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचे आरक्षण अगोदरच जाहीर झाले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सदस्य निवडीनंतर पदाधिकारी निवडीची प्रक्रिया वेगाने होणार आहे. याला आता काही आठवड्याचा अवधी उरल्यामुळे जिल्हा परिषदेतील अध्यक्ष उपाध्यक्ष व विषय समित्यांच्या सभापतींचे दालन सजविण्यात येत आहे. या दालनांची रंगरंगोटी व दुरुस्ती सध्या वेगात आहे. या कामाची पाहणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी गुरुवारी केली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाचे दालन खास पद्धतीने सजविण्यात येत आहे. या दालनाची सीईओ जंगम यांनी पाहणी केली व आत बसविण्यात येणाऱ्या सुविधांबाबत सूचना केल्या. अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक यांच्याही केबिनचे त्यांनी पाहणी केली. पत्रकार कक्षाला भेट देऊन तेथेही सुधारणा करण्याच्या त्यांनी सूचना केल्या. पत्रकार कक्षात ग्रंथालय सुरू करण्याविषयी त्यांनी सुचित केले. रंगभवन चौकातील यशवंतनगरात जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची व अधिकार्‍यांची निवासस्थाने आहेत. या ठिकाणी प्रवेशद्वाराच्या समोरच जिल्हा परिषद अध्यक्षांचे निवासस्थान आहे. आता या ठिकाणी वर्दळ वाटणार आहे. त्यामुळे या निवासस्थानांची ही रंगरंगोटी करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या सभागृहाची यापूर्वीच रंगरंगोटी झाली आहे. जिल्हा परिषदेचे सर्व कक्ष व अंतर्गत पोर्चची रंगरंगोटी व फरशी काम यापूर्वीच पूर्ण झाले आहे. स्वच्छताग्रहांचाही लुक बदलण्यात येत आहे. जिल्हा परिषदेत पदाधिकाऱ्यांच्या आगमनानंतर लोकांची वर्दळ वाढणार आहे त्या दृष्टीने सुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button