क्राईमपोलिससोलापूर

सोलापुरात उद्योजकाची 17 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

सोलापूर : अपार्टमेंटच्या टॉप फ्लोअरवर ते चढले. भिंतीवर उभे राहून हात जोडून काही वेळ फेऱ्या मारल्या. त्यानंतर भिंतीवर झोपले व अशाच अवस्थेत स्वतःला खाली झोकून दिले. होय… सोलापुरातीलच ही धक्कादायक घटना आहे. एकेकाळी ब्रेड कंपनीत नावाजलेल्या एका उद्योजकाने विजापूर रोडवरील पनाश आपारमेंटच्या सतराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी चार वाजता घडली आहे.

सुनील सदारगांनी (वय 59) असे आत्महत्या केलेल्या उद्योजकाचे नाव आहे. सदारंगांनी हे गुरुवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास आपल्या कारमधून पनाश अपारमेंटमध्ये आले. ते थेट वरच्या मजल्यावर गेले. काही काळ हात जोडून ते फिरले. त्यानंतर मजल्याच्या भिंतीवर ते झोपले. अशा स्थितीत त्यांनी आपल्याला खाली लोटून दिले. यात ते खाली पडून जागीच गतप्राण झाले. या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या घटनेनंतर अपार्टमेंटमधील लोकांची गर्दी झाली. माहिती मिळताच विजापूर नाका पोलिसांनी तेथे धाव घेतली. पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी कारचा नंबरवरून त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेतला. विजापूर नाका पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

होटगी रोडवर मुलतानी बेकरी या नावाने सदारंगांनी यांची मोठी बेकरी होती. मुलतानी हा ब्रेड एकेकाळी सोलापुरात गाजलेला ब्रँड होता. काही वर्षांपूर्वी ही बेकरी बंद पडली.  त्यानंतर अनेक संकट आल्यामुळे परिस्थिती बिघडली. त्यामुळे गेले काही दिवस ते तणावात होते असे सांगण्यात येत आहे. ते पुण्यात खराडीला राहत होते. पत्नीसमवेत ते सोलापुरात आले. त्यानंतर गुरुवारी दुपारी बाहेर जातो असे सांगून ते कार घेऊन गेले. त्यानंतर थेट पनाशमधील घटना उघडकीस आली. त्यांचा एक मुलगा अमेरिकेत राहतो तर दुसरा पुण्यात व्यवसाय करत आहे. आत्महत्या करण्यासाठी त्यांनी नेमके पनाश अपार्टमेंटच का निवडले याचे गुढ उकलले नाही, पण येथील कुटुंबीय मात्र घाबरल्याचे दिसून आले. सोलापुरातील प्रसिद्ध उद्योजक राजकुमार राठी यांचे ते जावई आहेत. घटनेची माहिती मिळताच मेहुण्याने पनाशमध्ये धाव घेतली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

रहिवाशांना मोठा धक्का 

पनाश अपार्टमेंट बिल्डरच्या व्यवहारामुळे वादातीत आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना सुविधा मिळत नाहीत. अशा हालाखीच्या परिस्थितीत ते दिवस काढत असताना अपार्टमेंटमध्ये अशी अनाकलीनीय घटना घडली आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना धक्का बसला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button