सोलापूरजिल्हा परिषद
सोलापूर झेडपीचे संतोष कुलकर्णी झाले अधीक्षक अभियंता

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग क्रमांक दोनचे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांची अखेर पदोन्नतीने बदली झाली आहे.
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी हे गेली बरेच दिवस पदोन्नतीच्या प्रतीक्षेत होते. विशेष म्हणजे यापूर्वी त्यांची सोलापूरच्या बांधकाम विभागात बदली झाली होती. पण त्यांनी पुन्हा सोलापूर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे नियुक्ती मिळवली. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्यातील सात कार्यकारी अभियंत्यांना पदोन्नती दिली आहे. यामध्ये संतोष कुलकर्णी यांना पदोन्नतीने रस्ते विकास महामंडळाच्या मुंबई विभागाचे अधीक्षक अभियंता म्हणून नियुक्ती झाली आहे. याबद्दल सीईओ कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी अभिनंदन केले आहे.



