सोलापूरजिल्हा परिषदशिक्षण

नेहरू वसतिगृहात येईल त्या विद्यार्थ्याला प्रवेश शिक्षण सभापती चेतनसिंह केदार यांचा निर्णय

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या मालकीच्या पार्क चौकातील नेहरू वसतिगृहात येईल त्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल, अशी माहिती झेडपीचे शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार यांनी दिली.

नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने नेहरू वस्तीगृहातील प्रवेश सुरू केले आहेत. शिक्षण विभागाने अंतिम मुदत देऊन केवळ 110 अर्ज आले आहेत. नेहरू वस्तीगृहाची क्षमता 325 इतकी आहे. एकेकाळी वेटिंगची लिस्ट लागणाऱ्या या वस्तीगृहाची सध्या अशी अवस्था आहे. विद्यार्थ्यांसाठी हे वसतिगृह असल्याने कोणत्याही शाखेत शिकत असलेले ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थी या वस्तीगृहात केव्हाही प्रवेश घेऊ शकतील, अशी माहिती सभापती केदार यांनी दिली. याबाबत शिक्षण समितीच्या सभेत चर्चा झाली आहे. या वस्तीगृहामध्ये विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सुविधा कशी देता येईल यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे असे त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषद शाळांच्या इमारत दुरुस्ती व नवीन बांधकामाची कामे हाती घेण्याबाबत सूचना देण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण खपवून घेतले जाणार नाही, तशा सूचना शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत असे सभपती केदार यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button