सोलापूरजिल्हा परिषद

झेडपी उपाध्यक्षांची पाहणी; लागलीच जिन्याची दुरुस्ती

सोलापूर : जिल्हा परिषदेची मुख्य इमारत व महिला बाल कल्याण अधिकाऱ्याच्या कार्यालयाला जोडणाऱ्या जिन्याची उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी पाहणी करताच तात्काळ सुट्टीदिवशी दुरुस्ती सुरू झाली आहे.

जिल्हा परिषदेची मुख्य इमारतीतून महिला बालकल्याण, पशुसंवर्धन, शिक्षण व आरोग्य विभागाच्या कार्यालयाकडे जाण्यासाठी लोखंडी जिना तयार करण्यात आला आहे. या लोखंडी जिन्याच्या पादचारी मार्गाचा लोखंडी पत्रा कुजल्याने छिद्र पडले आहेत. इथून ये जा करणाऱ्यांचा पाय या कुजलेल्या लोखंडातून बाहेर जाऊन धोका होऊ शकतो, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याकडे लक्ष वेधल्यावर यापूर्वी काही दिवस हा मार्ग बंद करण्यात आला होता. परंतु हा मार्ग बंद करण्यात आल्यामुळे अधिकाऱ्यांना ये जा करण्यासाठी अडचणी निर्माण होऊ लागल्या. त्यामुळे पुन्हा हा जिना सुरू करण्यात आला. पण जिन्याचा तुटलेला कठडा आणि पादचारी लोखंडी तुटलेले पाटे धोकादायक स्थितीत असल्याचे कळताच जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी शुक्रवारी पाहणी केली. यावेळी उपस्थित असलेले कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांना उपाध्यक्ष पवार यांनी तात्काळ हा जिना दुरुस्त करण्याच्या सूचना केल्या. कार्यकारी अभियंता कुलकर्णी यांनी याची दखल घेत तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. त्याबद्दल कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button