सोलापूरआरटीओसामाजिक

Rto मधील निवृत्त हेडक्लार्क हरवाळकर यांचा दुचाकी अपघातात मृत्यू

सोलापूर : येथील आरटीओ कार्यालयात हेड क्लार्क म्हणून निवृत्त झालेले शिवशरण हरवाळकर यांचे गुरुवारी सायंकाळी अपघाती निधन झाले आहे.

मूळचे अक्कलकोटचे असलेले शिवशरण हरवाळकर यांनी सोलापूर, अकलूज व पुणे आरटीओ कार्यालयात लिपिक म्हणून सेवा बजावली. सोलापूर आरटीओ कार्यालयात हेड क्लार्क म्हणून ते निवृत्त झाले. निवृत्तीनंतर त्यानी आपल्या शेतीकामात लक्ष घातले. मनमिळावू स्वभाव व गरजू लोकांना मदत करण्याच्या वृत्तीमुळे ते लोकप्रिय होते. गुरुवार दिनांक 5 मार्च रोजी सायंकाळी ते मदरे येथील शेतावरून सोलापूरकडे आपल्या दुचाकीवरून परत निघाले होते. मद्रे येथील चौकाजवळ समोरून दुचाकीवरून वेगाने आलेल्या स्वाराने त्यांना धडक दिली. यात खाली पडून ते गंभीर जखमी झाले. डोक्याला मार लागल्यामुळे उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले. शुक्रवार दिनांक 6 मार्च रोजी दुपारी चार वाजता त्यांच्या राहत्या घरापासून अंत्ययात्रा निघणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button