सोलापूर

झेडपी सीईओ मनीषा आव्हाळे यांनी घेतली कर्मचाऱ्यांची हजेरी

दिवाळी सुट्टीत निवांत झालेल्या कर्मचाऱ्यांची धावपळ

सोलापूर: जिल्हा परिषद प्रशासनाची शिस्त कायम ठेवण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी शुक्रवारी कार्यालयात उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांची हजेरी जाणून घेतली आहे.

सीईओ मनीषा आव्हाळे यांनी पदभार घेतल्यापासून कार्यालयीन शिस्तीवर भर दिला आहे. कर्मचाऱ्यांची क्रयशीलता तपासून घेण्यासाठी प्रशिक्षण व परीक्षा घेण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. याबाबत त्यांनी नुकतीच कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधीबरोबर बैठक घेऊन कार्यालयीन कामकाजाचे महत्त्व विशद केले आहे. त्यानंतर कार्यालयीन शिस्त कायम राहण्यासाठी शुक्रवारी सीईओ आव्हाळे यांनी आपल्या स्वीय सहाय्यकानमार्फत प्रत्येक कार्यालयातील कर्मचाऱ्यांची हजेरी जाणून घेतली. स्वीय सहाय्यकाने कार्यालयीन वेळेत प्रत्येक विभागात जाऊन फोटो सेशन केले आहे. या काळात जागेवर नसलेल्या कर्मचाऱ्यांना कारवाईचा फटका बसू शकणार आहे. त्यामुळे दिवाळी सुट्टीत निवांत झालेल्या कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी लावून आपल्या जागेवर बसण्यासाठी धावपळ दिसून आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button