July 10, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

Great work: पुण्यात पालखी मार्गावर दिसले सोलापूर झेडपीचे काम

सोलापूर : पंढरपुरातील आषाढी वारी सोहळ्याची तयारी जोरदार सुरू आहे. देहू- आळंदीहून मानाच्या संतांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने निघाल्या आहेत. पुण्यात मुक्कामी आलेल्या या पालखी सोहळ्याच्या निवास व्यवस्था सोलापूर झेडपीने चोखपणे बजावल्याचे दिसून आले.

आळंदीहून निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि देहून निघालेल्या जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे पुण्यात आगमन झाले आहे. हा पालखी सोहळा हळूहळू पंढरीच्या दिशेने पुढे सरकू लागला आहे. पालखी सोहळ्याबरोबर अनेक वारकरी सहभागी झाले आहेत. पालखी सोहळा मुक्कामी असताना वारकऱ्यांसाठी निवासासाठी जर्मन हँगर, पिण्याचे पाणी, स्नान व स्वच्छतागृहाची व्यवस्था यंदा सोलापूर जिल्हा परिषदेतर्फे करण्यात आली आहे. पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या या पालखी मार्गावरील सर्व व्यवस्था यंदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्हा परिषदेवर सोपवली आहे. त्यामुळे या पालखी सोहळ्याच्या बरोबरच सोलापूर जिल्हा परिषदेची यंत्रणा कामाला लागली आहे. पालखी मुक्काम स्थळावरील स्वच्छता व स्नानगृहे, पिण्याचे टँकर आदी व्यवस्था जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी व स्वच्छता विभागाचे संचालक अमोल जाधव यांच्या पथकाने चोखपणे बजावली आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेअंतर्गत
पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील पालखी मार्गावरील मुक्काम ठिकाणी जर्मन हँगर, स्नानगृह, मोबाईल टॉयलेट, चार्जिंग पॉईंट, भजन कार्यक्रम या सेवा देण्यात येत आहेत.. हिरकणी कक्ष, आरोग्य सुविधा, स्वागत कमान, पाण्याचे टँकर हे सर्व कामकाज व्यवस्थितरित्या चालू आहे की नाही हे पाहण्याकरिता लोणी- काळभोर, यवत आणि सासवड येथे प्रकल्प संचालक अमोल जाधव यांनी पाहणी दौरा केला. सोलापूर झेडपीचे सीईओ कुशल जैन यांनी पालखी मार्गावर यंत्रणा चोखपणे लावल्याबद्दल वारकऱ्यांमधून कौतुक होत आहे.