जिल्हा परिषदसोलापूर

सोलापूर झेडपीच्या डेप्युटी सीईओ स्मिता पाटील यांची कोल्हापूरला बदली

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांची कोल्हापूरला नागरी महिला बालकल्याण विभागाकडे प्रतिनियुक्तीवर बदली झाली आहे.

स्मिता पाटील यांनी 2019 मध्ये माळशिरसचे गटविकास अधिकारी म्हणून पदभार घेतला. त्यानंतर 3 सप्टेंबर 2021 मध्ये त्या जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता मिशन कक्षाकडे प्रकल्प संचालक म्हणून बदलून आल्या. येथून 17 जून 2022 मध्ये चंद्रपूरला बदली झाली. एक वर्षानंतर त्या पुन्हा जिल्हा परिषदेच्या प्रशासन विभागाकडे बदलून आल्या. या काळात त्यांनी सोलापूर जिल्हा परिषदेकडे चांगले काम केले.  सोलापूरला काम करण्याची चांगली संधी मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button