सोलापूरजिल्हा परिषद

अक्कलकोटचे उपअभियंता उंबरजे यांचा फोन बंद; शिवसेनेचे नेते तावातवाने झेडपीत

सोलापूर : माळशिरस माढ्यानंतर आता जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या उप अभियंता विरुद्ध तक्रारी वाढल्या आहेत. उप अभियंता उंबरजे यांचा मोबाईल गेल्या चार दिवसापासून बंद असल्यामुळे शिवसेनेचे नेते तावातावाने झेडपीत आल्या आणि त्यांनी कार्यकारी अभियंत्यांना याबाबत जाब विचारला आहे.

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे माळशिरस पंचायत समितीचे उपअभियंता मुलाणी यांना लोकप्रतिनिधींनी शिवीगाळ केल्याचा कॉल रेकॉर्डिंग काही दिवसापूर्वी वायरल झाला होता. त्यानंतर माढ्यातील प्रकरण समोर आले होते. या दोन तालुक्यानंतर आता अक्कलकोट तालुक्यातही अशीच परिस्थिती निर्माण झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. शिवसेनेचे नेते व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आनंद तानवडे हे मंगळवारी तावातवाने झेडपी आले. अक्कलकोट पंचायत समितीतील बांधकाम उप अभियंता हे गेले चार दिवसापासून कार्यालयात येत नाहीत. त्यांचा भ्रमणध्वनी बंद आहे. टेंडरला आवश्यक असलेले दाखले त्यांच्याकडून वेळेत मिळणे अपेक्षित आहे. हे दाखले दुसऱ्यांना जाऊन येत म्हणून गेल्या चार दिवसापासून ते गायब आहेत. टेंडर ओपन करण्यादिवशीच क्लार्क रजेवर जातो. असे प्रकार वारंवार बांधकाम विभागात घडत आहेत. उंबरजे रजेवर असतील तर दुसऱ्याकडे पदभार द्या आणि तात्काळ दाखले द्या अशी मागणी तानवडे यांनी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता खैरदी यांच्याकडे केली. कार्यकारी अभियंत्यांनी याबाबत मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. खैरादी यांनी अत्यंत कुशलपणे हे प्रकरण हँडल केल्यामुळे पुढील वाद तूर्त टाळल्याचे दिसून आले.

तिसरा प्रकार उघडकीस…

जिल्हा परिषदेच्या बांधकाम उप अभियंत्यावर अशी वेळ येण्याची ही तिसरी घटना आहे. जाणीवपूर्वक व भाजपचे मित्रपक्ष तसेच विरोधकांना कामे मिळू नयेत म्हणून जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी असहकार्याचे धोरण अवलंबल्याचा आरोप होत आहे. त्याचाच परिपाक म्हणून अशा घटना वारंवार उघडकीस येत आहेत. अक्कलकोटचे उपअभियंता उंबरजे हे कार्यालयात येत नाहीत व त्यांचा भ्रमणध्वनी बंद असल्यामुळे त्यांचा शोध घेण्यासाठी शिवसेनेचे कार्यकर्ते त्यांच्या घरापर्यंत गेल्याची चर्चा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button