सोलापूरक्राईम

बापरे..! गाडी सोडण्यासाठी हवालदाराने मागितली दीड लाखाची लाच

सोलापूर : गुन्ह्यात जप्त असलेली कार सोडण्यासाठी वैराग पोलीस ठाण्यातील हवालदार रवींद्र बाबर (रा. बाळे, सोलापूर) याने चक्क दीड लाखाची लाच मागितली आहे.

याप्रकरणी संबंधित गाडी मालकाने  दिलेल्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी हवालदार बाबर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यातील तक्रारदाराची ईरटीगा कार वैराग पोलिसांनी गुन्ह्यात जप्त केली होती. ही कार सोडण्यासाठी व गुन्ह्यातील कलम वाढ न करण्यासाठी हवलदार बाबर यांनी तक्रारदाराला दीड लाखाची लाच मागितली.  त्यानंतर तडजोडीवर एक लाख तीस हजार रुपये ठरवले. हवालदार बाबर यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक महाडिक यांनी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button