सोलापूरजिल्हा परिषद

सोलापूर झेडपीच्या विषय समिती सदस्यांची अशी होणार निवड

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या विषय समितीचे सदस्य निवडण्यासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य व मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या सूचनेने प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी बुधवार दि. 15 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजता जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात विशेष सभा होणार असल्याची नोटीस सदस्यांना बजावली आहे. सर्वसाधारण सभेनंतर महत्त्वाच्या असणाऱ्या स्थायी समितीच्या सदस्य पदी वर्णी लागण्यासाठी सदस्यांनी लॉबिंग सुरू केले आहे.

जिल्हा परिषद विशेष सभेत पुढील विषय प्राधान्याने घेण्यात येणार आहेत. पहिला विषय महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 चे कलम 78,79,80 व 81 च्या तरतूद अधिन राहून खालील प्रमाणे जिल्हा परिषदेने परिषद सदस्यामधून विषय समितीवरील सदस्य  निवडण्यात येणार आहेत. पहिल्यांदा स्थायी समिती. सदस्य आठ. समितीवरील पदांचा प्रवर्ग: सर्वसाधारण अनुसुचित जाती, अनुसचित जमाती, ना.मा.वर्ग.जलव्यवस्थापन व स्वच्छता समिती: सदस्य 6-जनरल-3 महिला-3. शिक्षण समिती, आरोग्य समिती, कृषी समिती, बांधकाम समिती, पशुसंवर्धन समिती, महिला व बालकल्याण  समिती:सर्वसाधारण (पैकी किमान 70% महिला सर्वसाधारण.कृषि समिती:10,समाजकल्याण समिती 10,

जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती व विषय समित्यावरील जागांच्या निवडणूकीबाबतची नामनिर्देशनपत्रे यशवंतराव चव्हाण सभागृह येथे सभेच्या दिवशी सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत स्विकारणेत येणार आहेत. नामनिर्देशन पत्राचे नमुने वरील वेळेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशा.) जिल्हा परिषद, सोलापूर जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये मिळतील व तेथेच स्विकारले जातील. नियमाप्रमाणे सभा सुरू होताच महाराष्ट्र जिल्हा परिषद (समित्यांच्या निवडणूका) नियम 1967 मधील प्रमाणे निवडणूकीचे कामकाज पारपाडणेत येईल, असे सभेच्या सचिव स्मिता पाटील यांनी जारी केलेल्या नोटिशीत नमूद केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button