सोलापूर : राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व याची सुरुवात पंढरपुरातून करून घेतल्याबद्दल माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या अभिनंदनचा ठराव जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीमध्ये करण्यात आला.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा नुकतेच झाली या सभेत करकंबचे सदस्य आदिनाथ देशमुख यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच या योजनेची सुरुवात पंढरपुरातून करून घेण्याबाबत पाठपुरावा केल्याबद्दल माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या अभिनंदनचा ठराव मांडला. महाराष्ट्र शासनाने कर्जमाफी करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. या योजनेची अंमलबजावणी पंढरपुरातून झाली. कर्जमाफीचा पहिला लाभ पंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यात आनंदाचे वातावरण आहे. त्याचबरोबर आदिनाथ देशमुख यांनी आषाढी यात्रा यशस्वी केल्याबद्दल पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांच्यासह पदाधिकारी व सीईओ कुशल जैन, ॲडिशनल सीईओ संदीप कोहिनकर यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांच्या अभिनंदनचा ठराव मांडला. हे दोन्ही ठराव एक मताने मंजूर करण्यात आले. याशिवाय देशमुख यांनी प्राथमिक शिक्षण विभागातील कामाबाबत सुधारणा सुचविल्या. आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्रांना पुरेसा औषध साठा उपलब्ध करून द्यावा अशीही सूचना यावेळी केली. संबंधित विभाग प्रमुखांनी या सूचनांचे पालन करावे असे आदेश जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य यांनी दिले.

More Stories
“बालक निरोगी तर भविष्य सुरक्षित’; सीईओ कुशल जैन यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य तपासणीला गती
झेडपीच्या सभेला दांडी मारणाऱ्या डीएचओना नोटीस देण्याच्या आदेश
अमोल जाधव यांना पांडुरंग पावला; मिळाली पंढरपूरची पोस्टिंग