सोलापूरजिल्हा परिषद

जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेचेवतीने गुणवंत पाल्यांचा सन्मान

सोलापूर : जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेचेवतीने गुणवंत पाल्य पुरस्कार कार्यक्रम शिवरत्न सभागृहात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य यांचे अध्यक्षतेखाली मुख कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचेहस्ते संपन्न झाला.

या कार्यक्रममात मार्च 2026 च्या झालेल्या दहावी- बाराबीच्या परीक्षेत 75 टक्के व त्यापेक्षा जास्त गुण मिळालेल्या सभासदांच्या पाल्यांचा सत्कार करण्यात आला. पाल्यांनी कष्ट करून मार्क मिळवलेत त्याबदद्ल त्यांचे सीईओ जैन यांनी अभिनंदन केले. पुढील परीक्षेत अजून चांगला अभ्यास करून यश मिळावा. काही अडचण आल्यास केव्हाही माझ्याशी संपर्क साधून माझी मदत घ्या , मी मदत करणेस तयार आहे असे यावेळी मार्गदर्शन करताना कुशल जैन यांनी सूचित केले. पतसंस्थेने हा चांगला उपक्रम राबविला आला आहे. सभासद यांच्या पाल्यानी चांगले मार्क मिळवलेत. या सर्वांना शुभेच्छा असे मत अध्यक्ष दीपक वैद्य यांनी याप्रसंगी व्यक्त केले.उपस्थित मान्यवरांचा सत्कार चेअरमन व संचालक मंडळाच्यावतीने करणेत आला.या कार्यक्रममास संस्थेचे मार्गदर्शक व्ही डी नवले,  माजी तज्ञ संचालक श्रीशैल देशमूख,दयानंद परिचारक उपस्थित होते.यावेळी दहावीचे 12 बारावीचे 6 पाल्यांचा सत्कार रोख रक्कम, प्रशस्तीपत्रक, सन्मान चिन्ह व पुस्तक, फाईल देऊन सत्कार करणेत आला. यावेळी चेअरमन शेतांबरी राऊत, श्रीधर कलशेट्टी, डॉ. एस पी माने,एस आर तांबोळी, एस. एन कुंभार, विशाल घोगरे, चेतन वाघमारे, शिवानंद म्हमाने, किरण लालबोन्द्रे, विष्णू पाटील, सौ. एम एस. शिंदे,रोहित घुले,व्ही एम घेरडे, शिवाजी राठोड,जी. एम. मारडकर,तजमूल मुतवलली, विकास शिंदे तज्ञ् संचालक, डॉ पी बी नवले, स्वी. संचालक के एन खुर्द,उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. एस. पी. माने यांनी केले तर आभार तजमूल मुतावल्ली यांनी मानले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button