जिल्हा परिषदशिक्षणसोलापूर

पाटकुल झेडपी शाळेचा शिक्षक बडतर्फ; सीईओ जंगम यांची कारवाई

सोलापूर : शाळेतील मुलीचा लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने शिक्षा ठोठावलेल्या धनाजी सोपान इंगळे (उपशिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातपुते वस्ती, पाटकुल ता. मोहोळ. जि. सोलापूर) याला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी सोमवारी बडतर्फ करण्याचे आदेश दिले.  आरोपी उपशिक्षक धनाजी इंगळे हा पाटकुल येथील सातपुते वस्ती शाळेवर कार्यरत असताना त्याच्याविरुध्द मोहोळ ठाण्यात भा.द.वि.क 376(2) (एन) 376(3), 354अ,354 व लैंगिक अपराधापासून बालकाचे संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4,6,8,12 प्रमाणे दि. 23 एप्रिल 2023 रोजी गन्हा नोंद झाला होता . या प्रकरणात त्याला अटक झाली होती. त्याला  24 एप्रिल 2023 रोजी विशेष न्यायालय, सोलापूर यांचेसमोर हजर केले असता, दि. 28 एप्रिल 2023 पर्यंत त्याला पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केल्याचे पोलिसांनी कळविले आहे. आरोपी उपशिक्षक धनाजी इंगळे याने फौजदारी पात्र गुन्हा करुन शिक्षकी पेशास अशोभनीय कृत्य केलेने या गंभीर गैरशिस्तीच्या वर्तनाबाबत त्याला अटक झालेल्या दिनांकापासून जिल्हा परिषद सेवेतून निलंबित करण्यात येऊन केलेल्या गैरशिस्तीच्या वर्तनाबाबत कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती. निलंबित उपशिक्षक धनाजी इंगळे याने  दोषारोपपत्राचे मुळ प्रत घेऊन पोहोचच्या दुस-या प्रतीवर स्वाक्षरी करणेस नकार दिल्याने कार्यालयास कळविले असल्याने त्याला आरोप अमान्य आहेत असे समजून सहा. आयुक्त, (चौकशी) विभागीय खातेनिहाय चौकशी पुणे यांची नेमणुक करण्यात आली होती.

निलंबित उपशिक्षक इंगळे याच्याविरुद्ध जिल्हा न्यायालयात खटला चालला. त्याने १२ वर्षीय शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याने विशेष न्यायालय (POCSO) सोलापूर यांनी दोषी ठरवून भारतीय दंड संहितेच्या कलम 354,354,3544,376 (2) (फ),376(2) (एन) आणि लैंगिक गुन्हापासून मुलांचे संरक्षण कायदा 2012 च्या कलम 4,6,8,12 अंतर्गत शिक्षेस पात्र असलेल्या गुन्हांसाठी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 235 (2) अंतर्गत दोषी ठरविण्यात येऊन नैसर्गिक मृत्यु येईपर्यंत जन्मठेप व 50 हजाराचा दंडाची शिक्षा ठोठावली आहे. आरोपी इंगळे याने  शिक्षकी पेशास अशोभनीय कृत्य केल्याचा गंभीर गुन्हा सिध्द झाला आहे. या गैरशिस्तीच्या वर्तनाबाबत, महाराष्ट्र जिल्हा परिषदा, जिला सेवा (वर्तणूक) नियम 1967 मधील नियम क्रमांक 3 या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी, जिला परिषद सोलापुर तथा नियुक्ती प्राधिकारी यांना प्राप्त असलेल्या अधिकाराचा वापर करुन पुढीलप्रमाणे शास्ती केली आहे.

महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम 1964 मधील नियम 4 (7) तरतुदीनुसार जिल्हा परिषद सेवेतून बडतर्फ करण्यात येत आहे. दि. 23 एप्रिल 2023 ते जिल्हा परिषद सेवेतन बडतर्फ केल्याच्या दिनांकापर्यतचा निलंबन कालावधी हा निर्णय कालावधी म्हणून घोषीत करण्यात येत आहे. या आदेशाची नोंद आरोपी उपशिक्षक धनाजी इंगळे याच्या मुळ सेवापुस्तकात घेऊन, नोंद घेतलेल्या पानाची छायांकित प्रत व सदर आदेशाची बजावलेची दिनांकित स्वाक्षरीची प्रत या कार्यालयात तात्काळ सादर करावी असे आदेशात नमूद केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button