सोलापूरकृषीजिल्हाधिकारी कार्यालयहवामान

सोलापूर जिल्ह्यात सात दिवसात 146% पाऊस

सोलापूर शहरनंतर दुष्काळी माळशिरस तालुक्यात सर्वाधिक पाऊस

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात गेल्या सात दिवसात 146.8% म्हणजेच सरासरी 150.5 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. सोलापूर शहरनंतर दुष्काळी माळशिरस तालुक्यात सर्वाधिक म्हणजेच 113 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वात कमी पाऊस मंगळवेढा तालुक्यात पडला आहे. सोलापूर शहरात सोमवारी रात्री अकरा वाजेपासून मंगळवारी दुपारचे दोन वाजले तरी पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे जनजीवनावर परिणाम झाला असून सखल भागातील घरामध्ये पावसाचे पाणी शिरले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाने गेल्या सात दिवसात जिल्ह्यातील मंडलनिहाय झालेल्या पावसाची आकडेवारी जाहीर केली आहे. यात सर्वाधिक पाऊस उत्तर सोलापूर मंडलात आहे. त्यामध्ये सोलापूर शहराबरोबरच शेळगी, मार्डी, वडाळा या मंडळाचा समावेश आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यात सरासरी 98.8 मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामध्ये बोरामणी, वळसंग, मंद्रूप, होटगी, मुस्ती, निम्बर्गी, विंचूर मंडळाचा समावेश आहे. बार्शी तालुक्यात 107.3 मिलिमीटर पाऊस झाला आहे. यामध्ये बार्शी, वैराग, उपळे दुमाला, गौडगाव पांगरी, पानगाव, नारी, सुरडी, खांडवी या मंडळाचा समावेश आहे. अक्कलकोट तालुक्यात 102 मिलिमीटर पाऊस झाला आहे. यामध्ये अक्कलकोट, जेऊर, तडवळ, करजगी, दुधनी, मैंदर्गी, वागदरी, चपळगाव, किनी मंडळाचा समावेश आहे. मोहोळ तालुक्यात 91.1 मिलिमीटर पाऊस झाला आहे. यामध्ये कामती, टाकळी, पेनूर, वाघोली, नरखेड, सावळेश्वर, शेटफळ, मोहोळ मंडळाचा समावेश आहे. माढा तालुक्यात 97.7 मिलिमीटर पाऊस झाला आहे. यामध्ये माढा, दारफळ, कुर्डूवाडी, रोपळे, म्हैसगाव, टेंभुर्णी, रांजणी, मोडनिंब, लऊळ या मंडळाचा समावेश आहे.

करमाळा तालुक्यात 99.2 मिलिमीटर पाऊस झाला आहे. यामध्ये करमाळा, अर्जुननगर, केम, जेऊर, सालसे, कोर्टी, उमरड, केतुर मंडळाचा समावेश आहे. पंढरपूर तालुक्यात 104 मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. यामध्ये पंढरपूर, भडीशेगाव, भाळवणी, करकंब, पटकुरोली, पुळुज, चळे, तुंगत, कासेगाव या मंडळाचा समावेश आहे. सांगोला तालुक्यात 101.9 मिलिमीटर पाऊस झाला आहे. यामध्ये सांगोला, शिवणे, जवळा, हातीद, सोनंद, महूद, कोळा, नाझरा, संगेवाडी मंडळाचा समावेश आहे. माळशिरस तालुक्यात 113 मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. यामध्ये इस्लामपूर, माळशिरस, सदाशिवनगर, दहिगाव, नातेपुते, अकलूज, लवंग, महाळुंग, वेळापूर या मंडळाचा समावेश आहे. मंगळवेढा तालुक्यात सर्वाधिक कमी म्हणजे 89.1 मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. यामध्ये मंगळवेढा, भोसे, हुलजंती या मंडळाचा समावेश आहे. विशेष म्हणजे मंगळवेढा तालुक्यात गेल्या तीन दिवसातच पाऊस झाला आहे. सर्वाधिक पाऊस सोलापूर शहर आणि उत्तर सोलापूर तालुक्यांमधील वडाळा शेळगी, बाळे परिसरात झाला आहे.

जूनमध्ये समाधानकारक पाऊस

कित्येक वर्षानंतर यंदाच्या वर्षी जूनमध्ये पावसाने चांगली सुरुवात केली आहे. हा पाऊस खरीप पेरणीसाठी अत्यंत उपयुक्त ठरला आहे. त्याचबरोबर बऱ्याच तालुक्यातील पाणीटंचाई या पावसाने दूर केली आहे. त्याचबरोबर या पावसामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही सुटणार आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

तालुकानिहय पाऊस (मिलिमीटर मध्ये)

उत्तर सोलापूर : 115.9

दक्षिण सोलापूर : 98.8

बार्शी : १०७.३

अक्कलकोट : 102.0

मोहोळ : 91.1

माढा : 97.7

करमाळा : 99.2

पंढरपूर :104.0

सांगोला : 101.9

माळशिरस : 113.0

मंगळवेढा : 89.1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button