आरोग्यजिल्हा परिषदसोलापूर

आरोग्य केंद्रात हवा पुरेसा औषधसाठा; सभापती चेतनसिंह केदार यांची सूचना

सोलापूर : जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्य सेवांची माहिती सहज उपलब्ध व्हावी आणि जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक गतिमान, पारदर्शक व नागरिकाभिमुख करण्यासाठी आरोग्य विभागाचे ॲप्लिकेशन विकसित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती चेतनसिंह केदार सावंत यांनी आरोग्य समितीमध्ये घेतला. त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आरोग्य समितीच्या बैठकीत विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
प्रस्तावित ॲपमध्ये जिल्ह्यातील किती आरोग्य केंद्रे आहेत, कोणत्या आरोग्य केंद्रात कोणत्या आरोग्य सुविधा व उपचार उपलब्ध आहेत, संबंधित केंद्राची आवश्यक माहिती तसेच विविध आरोग्य सेवांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नागरिकांना आपल्या जवळ उपलब्ध असलेली योग्य आरोग्य सुविधा सहज शोधता यावी, या उद्देशाने हे ॲप विकसित करण्यात येणार असल्याचे केदार सावंत यांनी मत व्यक्त केले.
“आरोग्य सेवा केवळ उपलब्ध असणे पुरेसे नाही, तर नागरिकांना ती सेवा कुठे आणि कशी मिळेल याची माहितीही एका क्लिकवर मिळाली पाहिजे,” या उद्देशाने तंत्रज्ञानाचा वापर करून आरोग्य सेवा अधिक सुलभ करण्यावर सभापती चेतनसिंह केदार सावंत यांनी भर दिला.
तसेच
ऑगस्टमध्ये 7,947 ईसीजी
राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत STEMI प्रकल्पाचा आढावा घेताना ऑगस्ट महिन्यात संपूर्ण जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर 7,947 ईसीजी तपासण्या करण्यात आल्याचे बैठकीत सांगण्यात आले.* यामध्ये 16 रुग्णांना हृदयविकाराचा झटका आल्याचे निदान झाले असून, त्यांना MJPJAY योजनेअंतर्गत उपचार देण्यात आले.
1,571 क्षयरुग्ण उपचाराखाली
राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात सध्या 1,571 रुग्ण उपचाराखाली असल्याची माहिती देण्यात आली. क्षयरोगाचे लवकर निदान होण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांवर येणाऱ्या संशयित क्षयरुग्णांची एक्स-रे तपासणी करण्याच्या सूचना सभापती सावंत यांनी दिल्या.
आरोग्य केंद्रांना औषधांचा सुरळीत पुरवठा करण्याचे निर्देश
सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक औषधे व आरोग्यविषयक साहित्याचा पुरवठा सुरळीतपणे होण्यासाठी आरोग्य विभागाने प्रभावी नियोजन करावे, अशा सूचनाही सभापती चेतनसिंह केदार सावंत यांनी दिल्या.
या बैठकीस आरोग्य समितीचे सदस्य श्री. व्यंकटराव भालके, श्रीमती सविता कोकाटे, श्रीमती संगीता दुधाळ, जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड,घाडगे, सर्व तालुका आरोग्य अधिकारी, मुख्यालय अधिकारी तसेच आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button