सोलापूरक्राईम

सोलापुरात बंद घर फोडून सव्वा दोन लाखाची रोकड लंपास

बेडरूममधील कपाटाचे लॉकर तोडून रोख रक्कम काढली

सोलापूर : सोलापुरातील जुन्या विडी घरकुलमधील बंद घर फोडून चोरट्याने बेडरूममधील कपाटातील दोन लाख तेरा हजाराची रोकड लंपास केल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
           याप्रकरणी गोपीचंद चव्हाण (रा. सोनिया नगर, जुना विडी घरकुल) यांनी फिर्याद दिली आहे. चव्हाण यांचे घर बंद असताना घरातील मुख्य लाकडी दरवाजा आणि बेडरूमच्या दरवाजाचे कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील कपाटाचे लॉक तोडून कपाटात ठेवलेली २ लाख १३ हजार रुपयांची रोकड चोरून नेली. दहा नोव्हेंबर रोजी चव्हाण घराला कुलूप लावून बाहेर गेले होते.  १४ नोव्हेंबर  रोजी घरी परत आल्यावर चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यावर चव्हाण यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून फौजदार रजपूत पुढील तपास करीत आहेत.
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button