सोलापूरजिल्हा परिषद

मंद्रूप ग्रामपंचायतीचा कारभार पुन्हा जोडमोटे यांच्याकडे

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप ग्रामपंचायतीचा कारभार पुन्हा निम्बर्गी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक नागेश जोडमोटे यांच्याकडे देण्यात आला आहे.

कालावधी पूर्ण झाल्यामुळे ग्रामसेवक नागेश जोडमोटे यांची निम्बर्गी ग्रामपंचायतकडे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी ग्रामसेवक पुजारी यांची नियुक्ती करण्यात आली. पदभार हाती घेतल्यापासून पुजारी यांना मंद्रूप ग्रामपंचायतीचा कारभार व्यवस्थितपणे हाताळता आला नाही. थकबाकी वसुली नसल्याने ग्रामपंचायतीचे उत्पन्न शून्यावर आले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा सुमारे दहा लाख पगार थकला आहे. वेळेवर पगार होत नसल्याने कर्मचाऱ्यांनीही कार्यालयीन कामकाजाकडे दुर्लक्ष केल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे ग्रामसेवक पुजारी यांच्याविरुद्ध तक्रारी सुरू झाल्यानंतर दक्षिण सोलापूर तालुका पंचायत समितीची डोकेदुखी वाढली आहे. अशात ग्रामसेवक पुजारी प्रदीर्घ रजेवर गेले आहेत. रजेच्या कारणाबाबत माहिती घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मोबाईल कॉल रिसीव्ह केला नाही. ग्रामसेवक पुजारी रजेवर गेल्यामुळे मंद्रूप ग्रामपंचायतीचा अतिरिक्त कारभार निम्बर्गी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक नागेश जोडमोटे यांच्याकडे देण्यात आला आहे. आग्रह करून पदभार घेणाऱ्या ग्रामसेवक पुजारी यांना मंद्रूप ग्रामपंचायतीचा कारभार हाताळण्यात अपयश आल्याने त्यांची बदली करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button