सोलापूर: सोलापुरात जानेवारीत फटाक्यांची दुकाने सजली आहेत. आता तर दिवाळी नसताना अशी दुकाने सुरू होण्याचे कारण काय? जिल्हाधिकारी व पोलिसांनी असे मध्येच फटाक्यांच्या दुकानांना परवानगी दिलीच कशी? असे अनेक प्रश्न सोलापूरकरांच्या मनात उभे राहिले आहेत. हो खरंच सोमवार दि. 22 जानेवारी रोजी सोलापूरच्या इतिहासात पहिल्यांदा दिवाळी साजरी केली जाणार आहे.
सोलापूरच्या चौका- चौकात फटाक्याची दुकाने सजली आहेत. आता तर दिवाळी नसताना फटाक्याची दुकाने सुरू होण्याचे कारण काय? उत्सुकतेने या दुकानासमोर गेल्यानंतर कारण समोर आले आहे. सोलापूरकर नव्हे तर संपूर्ण भारत देश सोमवार दि. 22 जानेवारी रोजी दिवाळी साजरी करणार आहे. अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्र यांच्या मूर्तीची नव्या मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. हा क्षण आनंदाने साजरा करण्यासाठी देशवासीयांनी दिवाळी साजरी करण्याची तयारी केली आहे. घरासमोर रांगोळ्या, घरावर आकाश कंदील, घरासमोर पणत्या लावून हा क्षण साजरा केला जाणार आहे. सोलापूर शहरातील अनेक घरात प्रभू श्री रामचंद्र यांच्या या सोहळ्याची अक्षता पोहोचविण्यात आली आहे. त्यामुळे घराघरात श्री प्रभू रामचंद्र यांचे स्वागत करण्यासाठी नागरिकांनी फटाके खरेदी सुरू केली आहे. फटाके सहज उपलब्ध व्हावेत यासाठी प्रशासनाने चौकाचौकात दुकानांना परवानगी दिली आहे. त्यामुळे भारतवर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच जानेवारीत अशी दिवाळी साजरी होणार आहे. चला तर मग या दिवाळीचे आपणही साक्षीदार बनुयात. बोला प्रभू श्रीरामचंद्र जी की जय..!

More Stories
माढा तालुक्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन फलोत्पादन मंत्री गोगावले यांच्याकडून पाहणी
सोलापुरात रमजान ईद उत्साहाने साजरी
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त सोलापुरात आध्यात्मिक मानवंदना