सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या उत्कृष्ट नियोजनानंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणखी एका कामासाठी अभिनंदनास पात्र ठरले आहेत.
निवडणूक आयोगाच्या सन 2023- 24 या वर्षातील कामासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी उत्कृष्ट काम केले आहे. भटक्या व विमुक्त जातीतील संस्था व व्यक्तींसाठी त्यांनी निवडणूक कामासाठी उत्कृष्ट काम केल्याची दखल राज्य निवडणूक आयोगाने घेतली आहे राज्य निवडणूक आयोगाने गेल्या वर्षभरात निवडणुकीच्या कामकाजासाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व पत्रकारांसाठी पुरस्कार जाहीर केले आहेत. त्यामध्ये सोलापुरातून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या कामाची दखल घेण्यात आली आहे जिल्हाधिकाऱ्यांना निवडणूक आयोगाकडून पुरस्कार जाहीर झाल्यानंतर विविध अधिकाऱ्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

More Stories
मुख्यमंत्री फडणवीस, प्रशांत परिचारक यांच्या अभिनंदनचा ठराव
“बालक निरोगी तर भविष्य सुरक्षित’; सीईओ कुशल जैन यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य तपासणीला गती
झेडपीच्या सभेला दांडी मारणाऱ्या डीएचओना नोटीस देण्याच्या आदेश